तरुण भारत

भेटवस्तूच्या आमिषाने तब्बल 88 लाखाचा गंडा

प्रेंड रिक्वेस्ट पाठविणाऱया अनोळखीने वृद्धेला ठकविले : प्रकरण उघडकीस आल्यानंतरही भामटय़ाकडून पुन्हा पैसे भरण्यासाठी तगादा

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

‘दुनिया झुकती हैं, झुकानेवाला चाहिये’ असे म्हणतात. जर कोणाला फसविण्याची अक्कल असली तर फसणाऱयांची संख्याही काही कमी नाही. आता तर सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात आर्थिक फसवणुकीच्या घटना घडत आहेत. ‘तुम्हाला किमती भेटवस्तू पाठविली आहे’, असे सांगत बेळगाव येथील वृद्धेला तब्बल 88 लाख रुपयांना गंडविण्यात आले आहे.

या प्रकाराने एकच खळबळ माजली असून यासंबंधी येथील सीईएन पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी या प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे. लंडनहून किमती भेटवस्तू पाठविल्याचे सांगून मोठी रक्कम हडपण्यात आली आहे. हा फसवणुकीचाच प्रकार आहे हे उघडकीस आल्यानंतरही भामटय़ांनी पुन्हा पैसे भरण्यासाठी तगादा लावला आहे.

सीईएन पोलीस स्थानकात फिर्याद

टिळकवाडी येथील एका वृद्धेने यासंबंधी येथील सीईएन पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. कोटय़वधी रुपयांची भेटवस्तू पाठविण्यात आल्याचे सांगून तब्बल 88 लाख रुपये त्यांच्याकडून उकळण्यात आले आहेत. केवळ चार महिन्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून हा सारा खेळ खेळला गेला. चार महिन्यांपूर्वी त्या वृद्धेच्या फेसबुक अकौंटवर एक प्रेंड रिक्वेस्ट आली. तिने ती ऍक्सेप्ट केली. त्यानंतर हे फसवणुकीचे नाटय़ सुरू झाले.

आपण लंडनमध्ये प्रसिद्ध डेन्टिस्ट (दंतवैद्य) असल्याचे सांगून भामटय़ाने वृद्धेबरोबर चॅटिंग सुरू केले. एक-दोन दिवसांत मोबाईल क्रमांक मिळविला. त्यानंतर व्हॉट्सऍपवर मेसेज सुरू झाले. या दंतवैद्याने सदर वृद्धेशी भावनिक नाते निर्माण केले. ‘आपण तुमच्यासाठी एक मोठी भेटवस्तू पाठवित आहे. एका कुरिअर कंपनीकडून तुमच्याशी संपर्क केला जाईल. ते सांगतील तसे करा म्हणजे लवकरात लवकर तुमच्या हातात मी पाठविलेली किमती भेटवस्तू पोहोचेल’ असे त्या दंतवैद्याने सांगितले.

27 डिसेंबर 2020 पासून भेटवस्तूचा फंडा सुरू झाला. त्यानंतर 18 जानेवारी 2021 रोजी कुरिअर कंपनीतून बोलते, असे सांगत एका महिलेने वृद्धेशी संपर्क साधला. तुमचे गिफ्ट पोहोचले आहे. त्यासाठी तुम्हाला 35 हजार 500 रुपये भरावे लागतील, असे सांगण्यात आले. त्या वृद्धेने त्वरित त्यांच्या सूचनेचे पालन करून पैसे भरले. त्यानंतर वेगवेगळी कारणे देत पैसे भरण्याच्या सूचना देण्यात आल्या. 35 हजारपासून सव्वासात लाख रुपयांपर्यंत तब्बल वीस वेळा त्यांनी सांगतील त्या खात्यात 88 लाख रुपये जमा करण्यात आले. तरीही किमती भेटवस्तू काही बेळगावला पोहोचली नाही. पुन्हा पैसे भरा, असे त्यांच्या सूचनाही थांबल्या नाहीत.

18 जानेवारी 2021 पासून 23 फेब्रुवारीपर्यंत सातत्याने भामटे सांगतील त्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे.

इन्कम टॅक्स क्लिअरन्स, आयएमएफ कोड, पर्सनल ऍक्सेस सर्टिफिकेट आदी वेगवेगळय़ा नावाने रक्कम उकळण्यात आली आहे. फेसबुकवरील एका अनोळखी प्रेंड रिक्वेस्टमुळे हा सारा प्रकार घडला आहे. आपण फसलो गेलो हे लक्षात येताच वृद्धेला धक्का बसला आहे.

पैसे पोहोचताच डॉक्टरने बदलले ठिकाण!

तब्बल 88 लाख रुपये वेगवेगळय़ा खात्यात जमा होताच त्या डेन्टिस्टकडून (दंतवैद्य) एक मेसेज येतो, आपण लंडनहून स्कॉटलंडला आल्याचे सांगत आपला मोबाईल क्रमांक बदलल्याचेही त्याने सांगितले व बदललेला क्रमांक त्या वृद्धेला पाठवून दिला. त्यानंतरही पैशासाठी तगादा सुरूच आहे.

Related Stories

बँकांमधून रोख रक्कम काढणाऱयांची संख्या वाढली

Amit Kulkarni

शेख कॉलेजमध्ये प्रेशर्स डे साजरा

Amit Kulkarni

गोवावेस-बॅ.नाथ पै चौक रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू

Patil_p

बेकिनकेरेतील नागनाथ मंदिर परिसराची स्वच्छता

Amit Kulkarni

आंबेवाडी येथे नवख्या चेहऱयांना संधी

Omkar B

अत्याचार करणाऱया नराधमाला 3 वर्षांचा कारावास

Patil_p
error: Content is protected !!