तरुण भारत

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांविरोधात राजर्षी शाहू शेतकरी आघाडी

प्रतिनिधी/कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांविरोधात राजर्षी शाहू शेतकरी आघाडीची घोषणा करण्यात आली. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि आमदार विनय कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या आघाडीची घोषणा करण्यात आली. यावेळी विद्यमान संचालक अरुणकुमार डोंगळे, जयश्री पाटील, विश्वास नारायण पाटील उपस्थित होते. शासकीय विश्रामगृह येथील पत्रकार परिषदेत आघाडीची घोषणा करण्यात आली.

यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील, जनसुराज्य प्रवक्ते विजयसिंह जाधव, माजी आमदार के. पी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, गोकुळची निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढविणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर सर्वजण एकत्र येऊन ही निवडणूक लढविणात आहोत. राजेश पाटील, प्रकाश आबीटकर आमच्यासोबत आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्याला दोन रुपये जादा दर कसा देता येईल यासाठी आमचे प्रयत्न असून गोकुळला वैभव प्राप्त करून देण्यासाठी आमचे प्रयत्न असणार असल्याचे ते म्हणाले.

आमदार विनय कोरे म्हणाले, मागच्या वेळी दोन जागा निवडून आल्या. या संघर्षला मोठे स्वरूप आलंय. आज पॅनल करून निवडणूक रिंगणात येतोय. महाविकास आघाडी म्हणून जरी लढत असलो तरी या निवडणुकीत पूर्ण महाविकास आघाडी म्हणता येणार नाही. या निवडणुकीत मी भाजपचा घटकपक्ष म्हणून काम करणार आहे. आज काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील हे विरोधात असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.

ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, सुरुवातीपासूनच महाविकासआघाडी म्हणून निवडणूक लढवण्यात यावी असे प्रयत्न सुरू होते. यासंदर्भात सत्ताधारी गटाचे नेते आमदार पी. एन. पाटील यांच्यावर चर्चा सुरू होती. परंतु त्यात यश आले नाही. ऐन निवडणुकीच्या तोंडावर गाफीलपणा होऊ नये म्हणून चर्चा बंद केली आणि आम्ही एकत्र आलो आहोत. मोठ्या ताकतीने आणि आनंदराव पाटील चुयेकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी ही निवडणूक लढवत आहोत.

Related Stories

पेठ वडगाव येथे सर्वपक्षीय कृती समितीकडून कृषी विधेयकाची होळी

Abhijeet Shinde

कोल्हापूर : व्हनाळी येथे गवताच्या गंजीला आग; सुमारे तीन लाखाचे नुकसान

Abhijeet Shinde

बाजारभोगाव पैकी मोताईवाडी येथील बेपत्ता महिलेचा मृतदेह सापडला…

Abhijeet Shinde

कोल्हापूर : औषध वितरण, रूग्ण नोंद न ठेवल्यास होणार कारवाई

Abhijeet Shinde

कबनूर: प्रलंबित मागण्या बाबत कामगारांचा संप सुरूच

Abhijeet Shinde

कायद्याचा योग्य अर्थ लावून धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावावेत

Abhijeet Shinde
error: Content is protected !!