तरुण भारत

बांबवडेत आत्महत्येचा प्रयत्न फसलेल्या तरुणाची अखेर आत्महत्या

वार्ताहर / बांबवडे

बांबवडेत दारुच्या नशेत सिने स्टाईलने पोलिस चौकी समोरील इमारती वरून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या खुटाळवाडी येथील तरुणाने अखेर जीवन संपवले. गणेश यशवंत चव्हाण वय २५ याने दुपारी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी तीनच्या सुमारास घडली.

गणेश याने दारुच्या नशेत बांबवडे पोलिस स्टेशनसमोरील इमारतीवरून उडी घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही तरुणांच्या सतर्कतेमुळे त्याचा प्रयत्न फसला होता. मात्र, त्यानंतर दुपारी तो घरी जाऊन त्याने गावाजवळ असणाऱ्या तळ्यालगतच्या झाडाला गळफास घेतला.
दरम्यान, कुटुंबीय आणि शेजारच्या लोकांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु काही लोक जागेवर पोहोचण्याआधीच त्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पश्चात आई व विवाहीत बहीण आहे.

Related Stories

वीजबिल घराबसल्या भरण्यासाठी ऑनलाईनसोबतच आता ‘आरटीजीएस व एनईएफटी’ची सुविधा

Abhijeet Shinde

वसतिगृहाच्या माध्यमातून महिला सुरक्षेला प्राधान्य – छ. शाहू महाराज

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात नवी रूग्णसंख्या दीडशेच्या खाली, पाच तालुक्यांत नवे रूग्ण शुन्य

Abhijeet Shinde

धामणी खोऱ्यात सापडले दोन कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार कायम, पंचगंगेची वाटचाल इशारा पातळीकडे

Abhijeet Shinde

सचिन तोडकर, प्रविण लिमकरसह १६ जणांच्या हद्दपारीचा प्रस्ताव

Abhijeet Shinde
error: Content is protected !!