तरुण भारत

ऑडीची इलेक्ट्रीक वाहने याचवर्षी बाजारात

वृत्तसंस्था/ मुंब

चारचाकी इलेक्ट्रीक वाहने बाजारात उतरवण्यासाठी विविध कंपन्यांची स्पर्धा येणाऱया काळात दिसणार असून ऑडीनेही आता या स्पर्धेत उतरण्याचे निश्चित केले आहे. ऑडी कंपनीच्या इ-ट्रॉन आणि इ-ट्रॉन स्पोर्टबॅक या दोन सुव्ह गटातील इलेक्ट्रीक मोटारी 2021 च्या मध्यावर सादर केल्या जाणार असल्याचे समजते.

Advertisements

एका चार्जवर सदरची इलेक्ट्रीक कार 452 किलोमीटरचे अंतर कापणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. इ-ट्रॉन आणि इ-ट्रॉन स्पोर्टबॅक अशी दोन इलेक्ट्रीक वाहने कंपनी बाजारात दाखल करणार आहे. 2019 मध्ये इ-ट्रॉन ही गाडी कंपनीने प्रदर्शित केली होती. भारतामध्ये चार्जिंग संदर्भातल्या पायाभूत सुविधांची सोय करण्यात होणाऱया अडचणीमुळे कंपनीने आपली नवी गाडी लॉन्च करण्याचे लांबणीवर टाकले होते. त्याचप्रमाणे कोरोनाच्या वाढत्या महामारीचाही विचार करून कंपनीने सदरचा निर्णय त्यावेळी घेतला होता. भारतात सदरची वाहने सादर करण्यासंदर्भातला मार्ग आता मोकळा झाला आहे. यावषीच्या मध्यावरच जून, जुलै, ऑगस्ट दरम्यान सदरची नवी वाहने सादर केली जाण्याची शक्मयता वर्तवली जात आहे. या वाहनांची किंमत 95 लाख रुपये ते 1 कोटी 2 लाख रुपये (एक्स शोरूम) इतकी असण्याची शक्मयता सांगितली जात आहे.

Related Stories

झोमॅटोचा नाइलाजास्तव आयपीओ?

Patil_p

स्टार्टअप क्षेत्रात 7.5 लाख रोजगार निर्मिती ?

Patil_p

कॅस्ट्रॉल इंडिया नफ्यात

Patil_p

24 कॅरेट सोने आता इतिहासजमा

datta jadhav

‘ओप्पो’ची भारतात पहिली 5-जी प्रयोगशाळा

Patil_p

रिलायन्सचे बाजारमूल्य 14 लाख कोटींवर

Patil_p
error: Content is protected !!