तरुण भारत

सिमेंट विक्रित 13 टक्के वाढीची आशा

क्रिसील संस्थेचा अंदाजः बांधकामसह विविध व्यवसायांमध्ये तेजी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

बांधकाम क्षेत्रातल्या वाढलेल्या हालचाली व विविध व्यवसायांनी घेतलेला वेग पाहता आर्थिक वर्ष 2022 मध्ये सिमेंटच्या विक्रीमध्ये 13 टक्के इतकी वाढ दिसू शकते, असा अंदाज क्रिसील या संस्थेने व्यक्त केला आहे.

बांधकाम क्षेत्रासह पायाभूत सुविधांच्या क्षेत्रांमध्ये वाढणाऱया हालचालीमुळे सिमेंटच्या मागणीमध्ये येणाऱया काळामध्ये वाढ दिसणार आहे. विविध व्यवसाय, उद्योगांतील हालचालींनी व प्रकल्पांच्या कामांनीही वेग पकडला असून यामुळे येणाऱया काळात सिमेंटच्या मागणीत वाढ अपेक्षीत आहे. दुसरीकडे कच्च्या मालाच्या किमतीतही वाढ होत असल्याने त्याचा परिणाम सिमेंटच्या उत्पादन खर्चावर होताना दिसतो आहे. ऊर्जा आणि इंधन तसेच मालवाहतूक खर्चाचा बोजाही सिमेंट उत्पादक कंपन्यांना झेलावा लागतो आहे. याचा परिणाम सिमेंटच्या किंमत वाढीत होतो का हे येणाऱया काळात पाहावे लागणार आहे. वाढत्या खर्चाच्या दबावाखाली कंपन्या सिमेंटचे उत्पादन घेत आहेत.

Related Stories

शाओमीकडून नोटबुक 14 सादर

Patil_p

शेअर बाजारात आठवडय़ाचा प्रारंभ तेजीसोबत

Patil_p

ट्रकच्या भाडय़ात 7 टक्क्यांची घसरण

Patil_p

सलग सहाव्या तिमाहीत बँक क्रेडिट वृद्धीत घसरण

Patil_p

एचसीएलकडून डीडब्ल्यूएसचे अधिग्रहण

Patil_p

तिसऱया सत्रात सेन्सक्सची 789.70 अंकांची उसळी

Patil_p
error: Content is protected !!