तरुण भारत

नावेली जि. पं. पोट निवडणुकीत एडविन कार्दोज यांची हॅट्ट्रिक

‘आप’मुळे काँग्रेसच्या प्रतिमा कुतिन्हो पराभूत

प्रतिनिधी / मडगाव

Advertisements

प्रतिष्ठेच्या नावेली जिल्हा पंचायत पोट निवडणुकीत काँग्रेस पक्षाने मोठा गाजावाजा करून प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा ऍड. प्रतिमा कुतिन्हो यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या मतदारसंघातून एडविन उर्फ सिप्रू कार्दोज हे अपक्ष उमेदवार 1830 मते प्राप्त करून विजयी झाले.

काल नावेली जिल्हा पंचायत पोट निवडणुकीसाठी मतमोजणी हाती घेतली, तेव्हा सुरवातीपासून एडविन उर्फ सिप्रू कार्दोज यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या विरोधात आघाडी घेतली होती. ती त्यांनी शेवट पर्यंत कायम ठेवत त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार प्रतिमा कुतिन्हो यांच्यावर 408 मतांनी विजय मिळविला. काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रतिमा कुतिन्हो यांना 1422 मते मिळाली तर आम आदमी पक्षाच्या उमेदवार मातिल्डा डिसिल्वा यांनी 1303 मते प्राप्त करीत प्रतिमा कुतिन्हो यांना दणका दिला. एडविन उर्फ सिप्रू कार्दोज यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चर्चिल आलेमाव यांनी पाठिंबा दिला होता. एडविन कार्दोज हे यापुर्वीही दोन वेळा विजयी झाले होते. काल त्यांनी तिसऱयांदा विजय प्राप्त करताना हॅट्रीक पूर्ण केली.

भाजपने सत्यविजय नाईक यांना निवडणुकीच्या रिंगणात आणले होते. त्यांना 787 मतांवर समाधान मानावे लागले. नावेली मतदारसंघातून भाजप आगामी विधानसभा निवडणूक लढवू पहात आहे व त्या दृष्टीकोनातूनच त्यांनी उमेदवार उभा केला होता. मात्र, कालच्या निकाल त्यांना समाधान देणारा नव्हता.

Related Stories

वास्को शहरातील परिस्थिती जैसे थे, दुपारनंतर सामसुम

Amit Kulkarni

सांखळीचा चैत्रोत्सव अखेर रद्द

Amit Kulkarni

म्हापशात खुबे काढताना युवकाचा नदीत बुडून मृत्यू

Omkar B

माजी मंत्री दिलीप परुळेकर यांची प्रकृती बिघडली

Patil_p

पत्रादेवी चेकनाक्यावर सात लाखांची दारू जप्त

Patil_p

संचारबंदी धाब्यावर बसवून होंडय़ात आठवडी बाजार कसा?

Amit Kulkarni
error: Content is protected !!