तरुण भारत

भाजप कार्यकर्त्यांनी केली मलप्रभेच्या घाटाची स्वच्छता

यमकनमर्डी मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा उपक्रम

प्रतिनिधी / खानापूर

Advertisements

बेळगाव जिल्हय़ातील यमकनमर्डी मतदारसंघातील भाजप नेते मारुती अष्टगी व त्यांचे सहकारी कार्यकर्ते दर रविवारी वेगवेगळय़ा ठिकाणी स्वच्छता अभियान राबवतात. यानुसार त्यांनी रविवारी खानापूरला भेट देवून मलप्रभा नदी घाटाची स्वच्छता केली. एवढेच नव्हे तर मलप्रभा नदीत अडकलेला कचरा बाजूला करुन मलप्रभा नदीचे पात्रही स्वच्छ केले.

रविवारी सकाळी 8 वाजता मारुती अष्टगी यांनी आपल्या सर्व सहकारी कार्यकर्त्यांना घेऊन स्वच्छता अभियान राबवण्यास सुरुवात केली. जवळपास अडीच तास ही मोहीम राबवून त्यांनी संपूर्ण घाट स्वच्छ केला. यामुळे कचऱयानी अस्वच्छ झालेला मलप्रभा नदीघाट पूर्णतः स्वच्छ झाला. यावेळी बोलताना मारुती अष्टगी म्हणाले, स्वच्छता अभियानाला जनतेकडून चांगले सहकार्य मिळत आहे. मलप्रभा नदी अत्यंत पवित्र मानला जातो. त्या ठिकाणी बांधलेल्या घाटाची तसेच परिसराची स्वच्छता राखणे आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. या जबाबदारीतूनच मी व माझ्या सर्व सहकार्यानी मलप्रभा नदी घाटाची स्वच्छता केली आहे.  

 याप्रसंगी बोलताना भाजप युवा नेते पंडित ओगले म्हणाले, मलप्रभा नदीला स्नानासाठी भाविक वर्ग मोठय़ा संख्येने येत असतो. पण स्नान केल्यावर पूजेचे सामान व इतर वस्तू नदीत सोडल्या जातात. गावातील बेजबाबदार नागरिकही घरातील सर्व घाण मलप्रभेत सोडून पात्र अस्वच्छ करत असतात. वास्तविक या पवित्र नदीची स्वच्छता राखण्याची सर्वांचीच जबाबदारी आहे.

यावेळी प्रसन्ना कुलकर्णी तसेच माजी नगरसेवक दिनकर मरगाळे यांचीही भाषणे झाली. त्यांनी मारुती अष्टगी यांच्या कार्याचे कौतुक करुन खानापूरच्या जनतेच्यावतीने त्यांना धन्यवाद दिले. या स्वच्छता अभियानात मारुती अष्टगी यांच्या नेतृत्वाखाली संतोष पाटील, दुंडाप्पा चौगुले, संतोष महाराज, प्रदीप कुरणे, किरण दानपगोळ, प्रशांत आदी, गजानन पाटील, शेखन्नावर, बसवराज कडी, मारुती गुरव व इतर अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. स्वच्छता अभियानाला भाजपचे नगरसेवक अप्पय्या कोडोळी, किरण यळळूरकर, वसंत देसाई, महांतेश बाळेकुंद्री, राजेंद्र चित्रगार आदीनीही भेट देवून त्यामध्ये काहीवेळ सहभाग घेतला.

Related Stories

ब्रह्मलिंग हायस्कूलतर्फे रामू गुगवाड यांचा सत्कार

Omkar B

उत्सवाचे पावित्र्य जपण्याची गरज

Amit Kulkarni

बेंगळूर-बेळगाव स्पेशल रेल्वे प्रवाशांना घेवून दाखल

Patil_p

त्या मृतदेहाची अद्याप ओळख नाही

Patil_p

‘बीपीएल’ कार्डधारक कुटुंबाला मिळणार एक लाखाची नुकसान भरपाई !

Rohan_P

वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त किसान सन्मान दिनाचे आयोजन

Omkar B
error: Content is protected !!