तरुण भारत

सांबरा परिसरात वीजपुरवठा सुरळीत करा

हेस्कॉमच्या साहाय्यक अभियंत्यांना शेतकऱयांचे निवेदन

वार्ताहर / सांबरा

Advertisements

सांबरा परिसरात अनियमित वीजपुरवठा करण्यात येत असल्याने पिकांना पाणी सोडणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. तरी हेस्कॉमने सुरळीत वीजपुरवठा करावा, अशा मागणीचे निवेदन साहाय्यक अभियंता चिकाडे यांना जिल्हा पंचायत माजी सदस्य नागेश देसाई यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱयांच्या शिष्टमंडळाच्यावतीने देण्यात आले.

सध्या दिवसेंदिवस उन्हाळा वाढत चालला आहे. अशातच हेस्कॉमकडून सांबरा, मुतगा, निलजी, मुचंडी आदी गावच्या शिवारामध्ये अनियमित वीजपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱयांना पिकांना पाणी सोडणे अवघड होऊन बसले
आहे.

हातातोंडाशी आलेली पिके गमावण्याची वेळ शेतकऱयांवर येऊन ठेपलेली आहे. शिवारातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात आली
आहे.

सकळी 9 ते 4 थ्री फेज वीज निवेदनाचा स्वीकार करून साहाय्यक अभियंता चिकाडे यांनी सकाळी 9 ते 4 या वेळेत थ्रीफेज वीजपुरवठा करण्याचे आश्वासन दिले. निवेदन देताना नागेश देसाईसह मधु मोदगेकर, वसंत पाटील, भरमा गोमानाचे आणि शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related Stories

‘त्या’ दगावलेल्या जनावरांना गंभीर आजार

Amit Kulkarni

दहावीचा आज विज्ञान पेपर

Patil_p

• जिल्हय़ात 4,89,264 शेतकऱयांना ‘किसान सन्मान’चा लाभ

Patil_p

हॉटेलमध्ये काम करत करतोय विद्यादान

Amit Kulkarni

अलारवाड क्रॉसजवळ ट्रक कलंडला

Patil_p

विनाकारण बाहेर फिरणाऱया वाहनांच्या संख्येत वाढ

Amit Kulkarni
error: Content is protected !!