तरुण भारत

मराठी विद्यानिकेतनमध्ये माजी विद्यार्थी गौरव सोहळा

प्रतिनिधी / बेळगाव

शनिवार दि. 20 मार्च रोजी माराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे माजी विद्यार्थी सीए परीक्षा उत्तीर्ण गौरव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव विक्रम पाटील, सहसचिव दीपक देसाई, शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, उपाध्यक्ष अनंत जाधव, गौरव सोहळय़ाचे सत्कारमूर्ती शाळेचे माजी विद्यार्थी विनायक जाधव, अतिश हिंडलगेकर उपस्थित होते.

Advertisements

प्रारंभी प्रार्थना झाली. ही प्रार्थना शाळेच्या संगीत विभागाने सादर केली. स्वागत मुख्याध्यापक आय. व्ही. मोरे यांनी केले. प्रास्ताविक संगणक शिक्षिका आणि माजी विद्यार्थिनी श्रुती कोवाडकर यांनी केले. नोव्हेंबर 2020 मध्ये झालेल्या सीए परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेले शाळेचे माजी विद्यार्थी विनायक जाधव व अतिश हिंडलगेकर यांची ओळख विज्ञान शिक्षिका सविता पवार यांनी करून दिली. सुभाष ओऊळकर यांच्या हस्ते सत्कारमूर्तींचा सत्कार करण्यात आला. उपस्थित माजी विद्यार्थिनी प्रा. विजयश्री चव्हाण यांनी शाळेतील आठवणींना उजाळा दिला. यशस्वी वर्गमित्रांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती विनायक जाधव आणि अतिश हिंडलगेकर यांनी सत्काराला उत्तर देताना म्हटले की, आम्हाला मिळालेल्या यशामध्ये आमच्या शाळेचा, कुटुंबातील सदस्यांचा आणि आमचे स्वतःचे अथक परिश्रम यांचा वाटा आहे. अनेक वेळा अपयश आले पण अपयशाने खचून न जाता आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे आम्ही सोडले नाही. यामध्ये शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. शाळेमुळे आम्ही हे यश संपादन करू शकलो, असेही ते म्हणाले. कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर संस्थेचे सचिव विक्रम पाटील, अनंत जाधव व दीपक देसाई यांनी सीए परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सत्कारमूर्तींचे अभिनंदन केले.  इतर विद्यार्थ्यांनाही असे यश संपादन करण्यासाठी आवाहन केले. मराठी विद्यानिकेतन शाळा ही या यशस्वी विद्यार्थ्यांमुळे श्रीमंत झाली आहे. सर्वच विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात नाव कमावून शाळेचे नाव मोठे करावे, असे सचिव विक्रम पाटील यांनी आवाहन केले. अध्यक्षीय समारोप सुभाष ओऊळकर यांनी केला. यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा गौरव केला. मातृभाषेतून शिक्षण घेणाऱया सर्व विद्यार्थ्यांसाठी शाळा सर्वतोपरी मदत करेल आणि त्यांच्या यशात मोलाचा वाटा उचलत राहील. विद्यार्थ्यांनी कष्ट करावेत आणि भरपूर यश कमवावे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल बडमंजी यांनी केले. आभार  गजानन सावंत यांनी मानले.

Related Stories

कागवाड शंभर टक्के बंद

Patil_p

भाजीपाला दरात भरमसाट वाढ

Patil_p

तिढा सुटता सुटेना; कर्मचारीही ठाम

Amit Kulkarni

मराठा युवक संघातर्फे 26 मार्च रोजी शरीरसौ ष्टव स्पर्धा

Amit Kulkarni

जीवनरेखा हॉस्पिटलमध्ये आजपासून तिसऱया टप्प्यातील को-व्हॅक्सिनची चाचणी

Omkar B

वळीव पावसाचा हेस्कॉमला दणका

Amit Kulkarni
error: Content is protected !!