तरुण भारत

अमेरिका : कोलोराडोच्या सुपरमार्केटमध्ये अंदाधुंद गोळीबार, 10 ठार

ऑनलाईन टीम /  वॉशिंग्टन :  

अमेरिकेच्या कोलोराडोमधील एका सुपरमार्केटमध्ये अज्ञात बंदुकधाऱ्याने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात एका पोलिसासह 10 जणांचा मृत्यू झाला आहे.  गोळीबार करणाऱ्या संशयित आरोपीला बोल्डर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, संशयित जखमी असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बोल्डर विभागाचे पोलीस प्रमुख कमांडर केरी यामगुची यांनी यासंदर्भात स्थानिक मीडियाला माहिती दिली आहे.  

Advertisements

यामगुची म्हणाले, बोल्डरमधील टेबल मेसा परिसरात असलेल्या किंग सुपर्स ग्रोसरी स्टोअर्समध्ये सोमवारी दुपारी 3 वाजता एका बंदुकधाऱ्याने अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत एका पोलिसासह 10 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोपीने कोणत्या उद्देशाने गोळीबार केला, याची माहिती अद्याप समोर आली नाही.

Related Stories

रॅपिड टेस्टिंग किटबाबत पूर्ण सहकार्य करू; चीनची भूमिका

prashant_c

हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या ट्रायलला बंदी : WHO

datta jadhav

मालदीव 15 जुलैपासून पर्यटकांसाठी खुले

datta jadhav

18 वर्षीय शमसीया अलीजादाने अफगाणिस्तानात रचला इतिहास

Patil_p

मेक्सिकोत कोरोनाबळींची संख्या 1.26 लाखांवर

datta jadhav

सौदी अरेबियाकडून येमेनमध्ये बॉम्बवर्षाव

Patil_p
error: Content is protected !!