तरुण भारत

”शरद पवारांना चुकीची माहिती देण्यात आली”

मुंबई / ऑनलाईन टीम

परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. या आरोपांवरून आता राजकीय आरोप प्रत्यारो याची मालिकाच सुरू झाली आहे. भाजप आणि परमबीर सिंग यांच्याकडून झालेले आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी काल पत्रकार परिषद घेत खोडून घेत अनिल देशमुख यांना पाठीशी घालण्य़ाचा प्रयत्न केला होता. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत गृहमंत्री होम क्वारंटाईन असल्याचा दावा खोडून काढला. गृहमंत्री अनिल देशमुखांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसल्याचे सांगत त्यांनी शरद पवरांना चुकची माहिती दिल्याचे देखील सांगितले.

Advertisements

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, १५ तारखेची गृहमंत्र्यांची ही कार्यक्रम पत्रिका (प्रत दाखवत) आहे. १५ तारखेला ते एका खासगी विमानाने आले होते. १५ तारखेला ते आपल्या घरी होते. पण पोलीस विभागाच्या दैनंदिन नोंदीचा एक कागद आहे. त्यात १७ फेब्रुवारीची एक तारीख आहे. त्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतला राहतील. तर अनिल देशमुख हे दुपारी ३ वाजता सह्याद्रीला येतील, अशी नोंद आहे. त्यानंतर २४ तारखेला पुन्हा अनिल देशमुख हे ११ वाजता मोटारीने निवासस्थानी जाणार असल्याचं पोलिसांची नोंद आहे. अर्थात त्या कार्यक्रमानुसार ते गेले असतीलच असा माझा दावा नाही. यात महत्त्वाची बाब म्हणजे सिंग यांनी जे पत्र लिहिलं आहे, त्यात मेसेजचा पुरावा दिला आहे. त्यात त्यांनी पाटील यांना बैठकीबद्दल विचारलेलं होतं. मला वाटतं शरद पवार यांना योग्य माहिती दिली गेली नाही. राष्ट्रीय नेत्याच्या तोंडून चुकीची गोष्ट वदवली गेल्याचे ते म्हणाले.

.

Related Stories

दिलासादायक : महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.54 %

Rohan_P

सांगलीत कोरोनाचे तीन बळी, नवे रूग्ण ४८

Abhijeet Shinde

पुराणे ही जीवनाला स्वर्ग करण्यासाठीचे माध्यम

Rohan_P

भारत-चीन संघर्षावर पंतप्रधानांची आज सर्वपक्षीय बैठक

datta jadhav

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबध्द : अजित पवार

Rohan_P

स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 ग्रामीणमध्ये सातारा जिल्हा नंबर वनवरच

Patil_p
error: Content is protected !!