तरुण भारत

सचिन वाझेंनी जबाबात खोटी माहिती दिली- एटीएस

मुंबई / ऑनलाईन टीम

उद्योजक मनसुख हिरेने मृत्यू प्रकरणी मुंबई एटीएसचे प्रमुख जयजीत सिंग यांनी आज पत्रकार परिषद घेत महत्त्वाची माहिती दिली. यावेळी त्यांनी सचिन वाझे यांनी जबाबात खोटी माहिती दिल्याचे सांगितले. याप्रकरणी आणखी आरोपी सापडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी बोलून दाखवली.

Advertisements

मुंबई एटीएसचे प्रमुख जयजीत सिंग म्हणाले की, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची 7 मार्च रोजी एटीएसने गुन्ह्याची नोंद केली. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी प्रमुख आरोपी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी सुरुवातील सर्व आरोप फेटाळून लावले. या प्रकरणात अटक लेलेल्या आरोपींच्या साक्षी आणि पुरव्यांचे विश्लेषण केलेले आहे. याप्रकरणी सचिन वाझे यांनी आपल्या जबाबात खोटी माहिती दिली होती. या प्रकरणात आणखी काही लोकांना अटक होण्याची शक्यता आहे. आमच्याकडे अनेक नावं आहे. अनेक संशयित आहेत. या व्यक्तींसंबंधित आम्ही फक्त पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करतोय. तांत्रिक पद्धतीने गुन्ह्यात वापरलेल्या सिमकार्डचा शोध घेण्यात आला असून, सचिन वाझेच्या सांगण्यावरूनच नरेश गोर याने विनायक शिंदे याला सिमकार्ड दिले, अशी माहिती सिंग यांनी दिली.

विनायक शिंदे हा निलंबित पोलीस कॉन्स्टेबल असून, लखनभैया बनावट चकमक प्रकरणात तो शिक्षा भोगत होता. त्याची नुकतीच तुरुंगातून पॅरोलवर सुटका झाली होती. त्याला एटीएसने ताब्यात घेतले आहे. या विनायक शिंदेला नरेश गोर याने वाझेंच्या सांगण्यावरून सिमकार्ड दिले. शिंदे याने फोन करून मनसुख यांना बोलावून घेतले. त्यांची हत्या झाली त्या ठिकाणी शिंदे हा उपस्थित होता. काही सिमकार्ड आणि मोबाइल फोन आरोपीने नष्ट केले. दमण येथून व्होल्वो कार जप्त केली आहे. तसेच या प्रकरणाशी संबंधित आम्ही महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज जमा केले आहेत. या प्रकरणात आरोपीने काही सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचे पुरवे समोर येत आहेत. तपास पथकाने आजपर्यंत झालेल्या तपासात अनेक साक्षीदारांचे जबाब नोंद केले आहेत. या गुन्ह्यातील काही आरोपी कोर्टात साक्ष देण्यासाठी तयार आहेत. सचिन वाझे हे एनआयएच्या 25 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत आहेत. त्यांची चौकशी करणे गरजेचे आहे. सचिन वाझे यांचा ताबा एटीएसला मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. या गुन्ह्याचा तपास महत्वाच्या टप्प्यात चालू आहे. एटीएस कसून तपास करत असून लवकरच या गुन्ह्याच्या मुळाशी जाण्याचा आम्ही प्रयत्न करु, असा विश्वास यावेळी सिंग यांनी व्यक्त केला.

Related Stories

कोल्हापूर : निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे चालक कोरोनाबाधित

triratna

दिल्लीत गेल्या 24 तासात 961 नवे कोरोना रुग्ण; 15 मृत्यू

pradnya p

नागठाणेत राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

Patil_p

भोपाळमध्ये 24 जुलैपासून पुन्हा एकदा लॉक डाऊन

pradnya p

रक्षाबंधनच्या दिवशी हरियाणाच्या 9 जिल्ह्यात सुरू होणार ‘महिला कॉलेज’

pradnya p

भारतात मागील आठ वर्षात ७५० वाघांचे मृत्यू

datta jadhav
error: Content is protected !!