तरुण भारत

13 वर्षीय मुलीला बलात्कारामुळे मातृत्व

इन्स्टाग्रामने बदलले नशीब

रशियात राहणारी 13 वर्षीय दार्या सुदनिश्रीकोवा या मुलीने प्रियकर 10 वर्षीय इवानमुळे गरोदर राहिल्याचा दावा मागील वर्षी केला होता. पण इवानचे वय पाहता अनेक तज्ञांनी हा दावा नाकारला होता. पण त्यानंतर या मुलीने सत्य सांगितले होते.

Advertisements

10 वर्षीय मुलामुळे तर एका व्यक्तीने बलात्कार केल्याने गरोदर राहिल्याचे दार्याने सांगितले होते. हे वृत्त समोर आल्यावर दार्या ऑनलाईन व्यासपीठांवर अत्यंत चर्चेत आली होती. दार्या आता 14 वर्षांची असून इन्स्टाग्राम आणि टिकटॉक सारख्या प्लॅटफॉर्म्सवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.

या सोशल मीडियाच्या माध्यमातून दार्या आता महिन्याला 5 हजार पौंड्स म्हणजेच 5 लाख रुपये कमावत आहे. तिच्या पालकांची एकूण कमाईही देखील तिच्याइतकी नाही. दार्या ट्रेंड होऊ लागल्यावर समाजमाध्यमांवर प्रचंड लोकप्रिय ठरली होती. याचबरोबर तिने अनेक लाइव्ह शोमध्येही हजेरी लावली आहे. ते प्रसिद्ध ब्रँड्स आणि पुरस्कृर्त्यांसह काम करण्यास तयार आहे.

गरोदर राहिल्याने दार्याने शाळेतून एक वर्षाचा ब्रेक घेतला होता. पण शाळेत परतल्यावर शिक्षक सातत्याने कमी ग्रेड्स देत असल्याचा आरोप तिने केला आहे. दार्याची सोशल मीडियावरील कारकीर्द आणि गरोदरपणामुळे शिक्षक नाराज असल्याचे तिचे म्हणणे आहे.

दार्याला प्रारंभी अन्नबाधा झाल्याचे वाटले होते. पण काही दिवसांनी प्रकरण अधिक गंभीर असल्याची जाणीव झाली. ती गरोदर असल्याचे चाचणीतून समोर आले होते असे कर्करोगाने ग्रस्त एलेना या दार्याच्या आईने म्हटले आहे.

Related Stories

इंडोनेशियाच्या माजी राष्ट्रपतींच्या कन्या स्वीकारणार हिंदू धर्म

Patil_p

कमी पगारामुळे ब्रिटनचे पंतप्रधान देणार राजीनामा

datta jadhav

कोलंबियात कोरोनाबळींची संख्या 25 हजारांच्या उंबरठ्यावर

datta jadhav

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सल्लागार मंडळात भारतीय

Patil_p

हॉलिवूडमधील ‘जेम्स बाँड’ काळाच्या पडद्याआड

Patil_p

चीनची कोरोनावरील लस बीजिंग ट्रेड फेअरमध्ये प्रदर्शित

datta jadhav
error: Content is protected !!