तरुण भारत

शाहूपुरी पाणी योजना लवकर कार्यान्वित करा

प्रतिनिधी/ सातारा

आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे माध्यमातून तत्कालीन परिस्थितीत मंजूर करण्यात आलेल्या शाहूपुरी उपनगरासाठीच्या नवीन कण्हेर पाणी पुरवठा योजनेच्या कामाची पाहणी शाहूपुरी ग्रामविकास आघाडीकडून करण्यात आली. ही योजना पूर्णत्वाच्या मार्गावर असून ती लवकर कार्यान्वित करा, अशी मागणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता चौगले यांच्याकडे करण्यात आली.

Advertisements

या पाहणी वेळी आघाडीचे भारत भोसले, माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्रकुमार मोहिते, नवनाथ जाधव, सुहास वहाळकर, शोभा केंडे, निलम देशमुख, माधवी शेटे, विकास देशमुख, सुरेश शेटे हे उपस्थित होते.                                                                                  

यावेळी शिष्टमंडळाने प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता चौगुले यांची भेट घेतली. या योजनेमध्ये उर्वरित ग्राहकांचा समावेश करणे, कनेक्शन शिफ्टिंग करणे, या योजने अंतर्गत अनेक भागात राहिलेले पाईप लाईन कामाला गती देणे आदी प्रश्नांबरोबरचं सद्यस्थितीत नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी त्वरीत पाऊले उचलण्या संदर्भात आग्रही मागणी करण्यात आली. आघाडीच्या या सर्व मागण्यांसंदर्भात योग्य ते सहकार्य देण्याची हमी कार्यकारी अभियंता चौगुले यांनी  दिली.

 दरम्यान, योजनेची पाहणी करताना संबंधित अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार या योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून कण्हेर येथील उपसा केंद्रासाठी आवश्यक असणा-या एक्स्प्रेस फिडरचे आवश्यक ते वीजपुरवठा यंत्रणेचे कामही एक- दोन दिवसांत सुरू होऊन या योजनेतील मोठा अडथळा दूर होण्यास मदत होणार आहे. 2015 च्या कार्यारंभ आदेशानुसार, 2017 साली पूर्ण होणारी ही योजना 2021 साल उजाडले तरी अनेक कारणांनी पूर्ण होऊ शकली नाही हे दुर्दैवी वास्तव असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.

आमदार शिवेंद्रराजेंच्या प्रयत्नातून निधी

 भारत भोसले म्हणाले, शाहूपुरी योजनेसाठी असलेल्या अपुऱया निधीची अडचण लक्षात घेऊन आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी अलिकडेच रुपये 12 कोटींचा अतिरिक्त निधी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांचेकडून मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे नागरिकांतर्फे या दोहोंचेही अभिनंदन. मात्र, आता ही योजना लवकरात लवकर पूर्ण व्हावी, ही शाहूपुरीवासियांची अपेक्षा असल्याचे शिष्टमंडळाने प्राधिकरणाच्या अधिकाऱयांना सांगितले.

Related Stories

नवी मुंबई विमानतळ नामकरण आंदोलनामुळे वळवण्यात आलेली वाहतूक पूर्ववत

Abhijeet Shinde

”कोरोना आणि मराठा आरक्षणावर विधानसभा अधिवेशन बोलविले पाहिजे”

Abhijeet Shinde

सातारा सैनिक स्कूल सीबीएससी दहावीचा निकाल १०० टक्के ‌

Abhijeet Shinde

भाजपाने ठेकेदार पोसण्याचे काम बंद करावे

Patil_p

जिल्ह्यातील 46 जण पॉझिटिव्ह तर तीन बाधितांचा मृत्यू

Abhijeet Shinde

सांगली : सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर बांधकाम कामगारांची निदर्शने

Abhijeet Shinde
error: Content is protected !!