तरुण भारत

धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची बाधा

ऑनलाईन टीम / मुंबई : 

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक शहरात लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः याबाबत ट्विट करत माहिती दिली. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीही धनंजय मुंडे कोरोना बाधित झाले होते. त्यावेळी उपचार घेत मुंडे यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती. 

Advertisements


ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, माझी आज दुसऱ्यांदा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती. मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखे काही नाही.सर्वांनी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.


यापूर्वी म्हणजेच गेल्या वर्षी 12 जून रोजी धनंजय मुंडे यांना पहिल्यांदा कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांनी स्वतः ट्विट करत म्हटले होते की, मित्रांनो, मी बरा आहे काळजी करू नका. कोणी कसलाही त्रास करून घेऊ नका. तुमचे आशीर्वाद, तुमचे प्रेम माझ्यापर्यंत पोहोचते आहे. त्यामुळे अन्नत्याग, पायपीट, नवस असे स्वतःला इजा करणारे कृत्य करू नका ही कळकळीची विनंती. तुम्हाला होणारा त्रास हा मला वेदना देणारा आहे. 


दरम्यान, कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मातोश्री रश्मी ठाकरे यांनाही ही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या सध्या वर्षा या शासकीय निवासस्थानी होम क्वारंटाइन असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर काही दिवसांपूर्वी त्याचे सुपुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

Related Stories

यावर्षी होणार ५ कंपन्यांचे खासगीकरण

Amit Kulkarni

शिरोळ तालुक्यामध्ये दिवसभरात ४४ कोरोनाबाधित

Abhijeet Shinde

दिलासादायक! महाराष्ट्रात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक

Rohan_P

झारखंडमध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 51.33 टक्के

Rohan_P

सचिन वाझेंना हृदयविकाराचा त्रास; खासगी रूग्णालयात उपचार घेण्यास न्यायालयाची परवानगी

Rohan_P

विकेंड लॉकडाऊनसाठी प्रशासन सज्ज

Patil_p
error: Content is protected !!