तरुण भारत

वनाधिकारी एस. एस. निंगानी यांचा जागतिक वनदिनी सत्कार

प्रतिनिधी / बेळगाव

सतत वनसंवर्धनासाठी झटणाऱया वनाधिकारी एस. एस. निंगानी यांच्या जीवनातील प्रवास थक्क करणारा आहे. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण ते फक्त आणि फक्त जंगलातील वृक्षसंपदा आणि पशु-पक्ष्यांच्या संवर्धनासाठी व्यथित करत आहेत. एक गार्ड म्हणून सेवा सुरू करून आज ते साहाय्यक वनसंरक्षक म्हणून काम पहात आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव होणे गरजेचे होते, असे विचार अध्यक्ष संजय पाटील यांनी मांडले.

Advertisements

जागतिक वनदिनाचे औचित्य साधून निंगानी यांचा संजय पाटील यांच्या हस्ते मानपत्र, शाल, पुष्पहार आणि श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष संजय पाटील, विशेष समिती सदस्य मोहन कारेकर आणि सचिव विजय बनसूर होते. सत्काराला उत्तर देताना वनाधिकारी निंगानी यांनी जायंट्सप्रती कृतज्ञता व्यक्त करून आपल्या सेवाकार्याचा आढावा घेतला आणि वेगवेगळय़ा चित्तथरारक प्रसंगात आलेले अनुभव सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. स्वागत आणि प्रास्ताविक मोहन कारेकर यांनी केले. यावेळी विविध संस्था आणि वैयक्तिकरित्या निंगानी यांचा सन्मान करण्यात आला. जायंट्स भवन येथे झालेल्या कार्यक्रमास मोठय़ा संख्येने जायंट्स सभासद, वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन मदन बामणे तर आभार अविनाश पाटील यांनी मानले.

Related Stories

वेदांत सोसायटीतर्पे डॉक्टरांचा सन्मान

Patil_p

पोस्टल बॅलेट मतदानाला वृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Amit Kulkarni

साईराज वॉरियर्स, एक्स्ट्रीम स्पोर्ट्स संघांचे विजय

Amit Kulkarni

जिह्यात शुक्रवारी 24 कोरोना बाधित

Patil_p

स्वच्छतागृह बांधण्यास तीव्र विरोध

Amit Kulkarni

वॉर्ड क्रमांक 56 मधील समस्या सोडवा रहिवाशांचे मनपा आयुक्तांना निवेदन

Omkar B
error: Content is protected !!