तरुण भारत

पंचायतराज खात्याच्या अधिकाऱयांची बेळगावला भेट

विविध ठिकाणी भेटी देऊन केली कामांची पाहणी

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

बेळगाव तालुक्मयातील विविध कामांच्या पाहणीसाठी पंचायतराज खात्याच्या अधिकाऱयांनी भेट दिली. यावेळी विविध कामांची पाहणी करून कामाची प्रशंसा करण्यात आली. याचबरोबर जिह्यातील विविध तालुक्मयांनाही भेटी देण्यात आल्या. बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

बेळगाव तालुक्मयात नुकताच राबविण्यात आलेल्या उद्योग खात्री योजनेतील तलावांची पाहणी करण्यात आली. बालस्नेही केंद्रांच्या पाहणीने संबंधित अधिकारी खूश झाले. विकास हा बेळगाव तालुक्मयाचा नसून भावी पिढीचा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. बेळगाव तालुक्मयात मोठय़ा प्रमाणात विकास करण्यात आला असून यापुढेही असेच काम करण्याचे सांगण्यात आले.

बेळगाव तालुक्मयासह हुक्केरी, खानापूर आदी ठिकाणी पाहणी करण्यात आली. हुक्केरी तालुक्मयातही अनेक कामे राबविण्यात आली आहेत. ग्रा. पं. दुरुस्तीसाठीचा प्रस्ताव आणि झालेली कामे याची पाहणी केली आहे. बेळगाव तालुक्मयाबरोबरच दुर्गम भागात असलेल्या बालस्नेही अंगणवाडय़ांची स्वच्छता आणि तेथील व्यवस्था पाहून अधिकारी भारावून गेले. त्यांनी अनेक विकासकामे करण्यासाठी मोठा निधी सरकारकडून मंजूर करून आणण्याचे आश्वासन दिले.

Related Stories

430 लाभार्थी अंत्यसंस्कार मदत निधीच्या प्रतीक्षेत

Omkar B

होनगा येथे शिवछत्रपतींचा पुतळा भूमिपूजन कार्यक्रम

Patil_p

टॅक्सी मालक-चालक असोसिएशनतर्फे अल्पदरात रुग्णवाहिका उपलब्ध

Omkar B

शिक्षकच करताहेत शाळेची स्वच्छता

Omkar B

सोमवारीही पावसाची दमदार हजेरी

Amit Kulkarni

खानापूर तालुक्यात गुरुवारी आणखी 6 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर

Rohan_P
error: Content is protected !!