तरुण भारत

जिल्हय़ात 14 जणांना कोरोनाची लागण

तालुक्मयातील सात जणांचा समावेश

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

मंगळवारी जिह्यामध्ये कोरोनाचे 14 रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये तालुक्मयातील सात जणांचा समावेश आहे. इतर जिह्यांच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. ही बाब सुखद असली तरी गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येचा आकडा पाहता भीतीचे वातावरण पसरले आहे. तेव्हा प्रत्येकाने कोरोनाचे सर्व नियम पाळणे ही काळाची गरज आहे. अन्यथा मागील वर्षाचीच पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त होत आहे.

मंगळवारी शहर परिसरातील कंग्राळी खुर्द, द्वारकानगर, ओंकारनगर, चन्नम्मानगर यासह गोकाक, खानापूर, हुक्केरी या तालुक्मयांमध्ये रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचे रुग्ण मंगळवारी कमी आढळले तरी बरेच जण खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती पुढे येत आहे. तेव्हा प्रत्येकानेच कोरोनाबाबत दक्षता घेणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी लॉकडाऊन करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत तर काही ठिकाणी लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. बेळगावच्या सीमेवरच महाराष्ट्र वसलेले आहे. त्यामुळे प्रत्येकानेच काळजी घेणे गरजेचे आहे. आरोग्य विभागाने सर्व ती खबरदारी घेतली आहे. असे असले तरी प्रत्येकाने स्वतःची काळजी स्वतः घेणे महत्त्वाचे आहे, असे आरोग्य विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

Related Stories

1 नोव्हेंबर रोजी तालुक्मयात कडकडीत हरताळ

Patil_p

उन्नतीतर्फे संक्रांतीनिमित्त विक्री मेळावा

Patil_p

सांडपाणी प्रकल्पप्रकरणी मनपा आयुक्तांना 5 हजारांचा दंड

Amit Kulkarni

वरेरकर नाटय़ संघात रंगभूमी दिन साजरा

Patil_p

तब्बल दहा दिवसांनंतर शेतकऱयांची धडपड

Amit Kulkarni

बुडाच्या व्यापारी संकुलात पावसाचे पाणी शिरल्याने नुकसान

Patil_p
error: Content is protected !!