तरुण भारत

सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रात

मुंबई / ऑनलाईन टीम

देशात पुन्हा एकदा कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. देशातील दोन राज्यांमध्ये परिस्थिती चिंताजनक आहे. यामध्ये महाराष्ट्राच पहिल्या क्रमांकावर आहे. देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रात आहेत. यामध्ये पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव आणि अकोलाचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांची पत्रकार परिषद पार पडली.

Advertisements

राजेश भूषण म्हणाले की, महाराष्ट्रात गेल्या २४ तासात २८ हजार रुग्णांची नोंद झाली असून पंजाबमध्येही लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णसंख्या जास्त आहे. याशिवात गुजरात, मध्य प्रदेशातही चिंताजनक स्थिती आहे. गुजरातमध्ये दिवसाला १७०० तर मध्य प्रदेशात १५०० रुग्ण सापडत आहेत. गुजरातमध्ये सर्वाधिक रुग्ण सूरत, अहमदाबाद, वडोदरा, राजकोट आणि भावनगरमध्ये आहेत. मध्य प्रदेशात भोपाळ, इंदोर, जबलपूर, उज्जैन आणि बेतूलमध्ये जास्त रुग्ण आहेत.

Related Stories

कोल्हापूर : पंतप्रधान स्वनिधी योजनेसाठी फेरीवाला नोंदणीस सुरुवात

triratna

अकोल्यात कोरोनाचा पहिला बळी

prashant_c

पुणे विभागातील 5.18 लाख रुग्ण कोरोनामुक्त!

pradnya p

सत्तर टक्के रुग्णांना पुन्हा होतोय कोरोनाचा संसर्ग

prashant_c

75 टक्के मुक्ती गाठलेल्या सातारा जिल्ह्यात नव्याने 21 बाधित

triratna

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचे निधन

pradnya p
error: Content is protected !!