तरुण भारत

मोबाईल इंडिया एक्स्पो 2021 ला प्रारंभ

प्रदर्शनाचे आयोजन दिल्लीमध्ये- कोरोना नियम पाळणे बंधनकारक

नवी दिल्ली

Advertisements

 देशाची राजधानी दिल्लीमध्ये मोबाईल इंडिया एक्स्पो 2021 प्रदर्शन बुधवारपासून सुरूवात झाले असून 26 मार्चपर्यंत राहणार असल्याची माहिती आहे. तीन दिवसांच्या या प्रदर्शनात जगभरातील विविध कंपन्या सहभागी झाल्या आहेत. सदरच्या प्रदर्शनात 5-जी टेक्नॉलॉजी आणि त्याच्याशी संबंधीत गॅजेट्सची मांडणी आकर्षण ठरणारी असेल.दिल्लीमधील प्रगती मैदानावर प्रदर्शन सुरू असून यामध्ये देशातील कंपन्यांसोबत 5-जी तंत्रज्ञानांवर आधारित असणाऱया नवीन गोष्टींचा समावेश असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.

मोबाईल एक्स्पोमध्ये प्रामुख्याने एक्झीबिटर प्रोफाइलच्या अंतर्गत प्रदर्शनामध्ये डिव्हाईस, ऍक्सेसरीज, व्हेयरेबल्स, युएसबी गॅजेट्स आणि कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स आदी उत्पादनांचा समावेश केला आहे.

देशातील 333 कंपन्यांचा समावेश

सदरच्या प्रदर्शनात जगभरातील एकूण 573 कंपन्या सहभागी होणार आहेत. यामध्ये भारतामधील सर्वाधिक 333 कंपन्यांचा सहभाग असणार आहे.

न्य देशांचा सहभाग

अन्य देशांमध्ये प्रामुख्याने तैवान, चीन, युएई, आफ्रिका, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, हाँगकाँग, सिंगापूर, कोरिया, इंग्लंड, झेक प्रजासत्ताक, फ्रान्स,  स्वीडन, जर्मनी, नेदरलँड, श्रीलंका, स्विर्त्झलँड आणि अन्य देशांचाही यामध्ये समावेश राहणार असल्याची माहिती आहे.

Related Stories

सेन्सेक्समध्ये घसरण -निफ्टी स्थिर

Patil_p

दूरसंचार उपकरणे निर्मितीला मिळणार बळ

Patil_p

हिंदुस्थान युनिलिव्हरच्या नफ्यात 10 टक्के वाढ

Amit Kulkarni

वाहन क्षेत्र निराश !

Omkar B

जिओमध्ये महिन्यात केकेआरची पाचवी मोठी गुंतवणूक

Patil_p

आयटीसीच्या नफ्यात 30 टक्के वाढ

Patil_p
error: Content is protected !!