तरुण भारत

निकिता तोमर हत्या; दोघे आरोपी दोषी

फरिदाबाद / वृत्तसंस्था

हरियाणातील बहुचर्चित निकिता तोमर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी तौसिफ आणि त्याचा सहकारी रेहानला न्यायालयाने दोषी ठरविले. फरिदाबादमधील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने याप्रकरणी बुधवारी निकाल दिला असून आता दोषींना 26 मार्च रोजी शिक्षेची सुनावली जाणार आहे. दरम्यान, न्यायालयाने निकाल देतानाच हत्येसाठी शस्त्र पुरविणाऱया अझरुद्दीन नामक संशयिताची मुक्तता केली आहे. 21 वषीय निकिता तोमरची गतवषी ऑक्टोबर महिन्यात दिवसाढवळय़ा गोळी घालून हत्या करण्यात आली होती. अपहरणाचा कट फसल्यानंतर ही हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर एसआयटीने तपास हाती घेत तब्बल 57 जणांचे साक्षी-पुरावे नोंदवले होते.

Advertisements

Related Stories

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा कट उधळला

Patil_p

प्रशांत किशोर बनले पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार

datta jadhav

गुजरात : रुळावर उभ्या असलेल्या रेल्वेला लागली आग

Rohan_P

प्रशांत भूषण प्रकरणी निर्णय राखून

Patil_p

दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी 300 पेक्षा अधिक कोरोना रुग्ण; 3 जणांचा मृत्यू

Rohan_P

डॉक्टरांवरील हल्लेखोरांना 3 महिने ते 7 वर्षे कारावास

Patil_p
error: Content is protected !!