तरुण भारत

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविण्याची मागणी

प्रतिनिधी/ सातारा

 साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुर्णाकृती पुतळा सातारा शहरामधील शाहुचौक येथे ज्या ठिकाणी अर्ध कृती पुतळा आहे, त्याच ठिकाणी बसविण्यात यावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) मातंग आघाडी सातारा जिल्हा तर्फे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. याप्रसंगी सातारा जिल्हाध्यक्ष किशोरभाऊ गालफाडे, शहर अध्यक्ष मधुकर घाडगे, प्रकाश वायदंडे, शेखर वायदंडे, प्रतिक मुळे आदी उपस्थित होते.

Advertisements

 सातारा शहरामध्ये सर्व महामानवांचे पुतळे पूर्णाकृती स्वरूपात आहेत, केवळ साहित्य रत्न आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा अर्धाकृती आहे. सदर पुतळ खुप वार्षापुर्वी बसविण्यात आल्यामुळे त्याला छोटे-छोटे छिद्रे देखिल पडलेले आहेत. तसेच ज्या ठिकाणी पुतळा आहे त्या भागाचे सुशोभिकरण करणे ही गरजेचे आहे. पुतळय़ाची स्वच्छता व देखभाल ही व्यवस्थितरित्या केली जात नाही. तरी यासर्वांचा गांभिर्याने विचार करून तात्काळ निधी उपलब्ध करून पुर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा व या पुतळय़ाची आणि आजुबाजुचा परिसर स्वच्छ ठेवण्याकरीता कायमस्वरूपी एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.

Related Stories

बडोदा बँक मिरज शाखेला 17 कोटींचा गंडा

Abhijeet Shinde

आणखी एका बोगस डॉक्टरला अटक

Patil_p

सोनजाई डोंगरावर दोन हजार वर्षापूर्वीची लेणी उजेडात

datta jadhav

कराडजवळ अपघातात तीन ठार

Abhijeet Shinde

मुलगी ताब्यात देण्यासाठी पत्नीचे अपहरण

Patil_p

सातारा : लॉकडाऊनमध्ये वाढतोय पोटदुखीचा त्रास,25 ते 50 वयोगटांना अधिक त्रास

Abhijeet Shinde
error: Content is protected !!