तरुण भारत

‘नगर प्रशासन’च्या 530 रिक्त जागांवर लवकरच नेमणुका

प्रतिनिधी / बेंगळूर

नगर प्रशासन खात्यात रिक्त असणाऱया 530 पदांची भरती करण्यासाठी ठोस पावले उचलण्यात आली आहेत. कर्नाटक लोकसेवा आयोगामार्फत नेमणुकीची प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे, अशी माहिती नगर प्रशासन आणि साखरमंत्री एम. टी. बी. नागराज यांनी दिली. विधानपरिषदेत मंगळवारी काँग्रेसचे सदस्य के. सी. कोंडय्या यांच्या प्रश्नावर मंत्री नागराज यांनी उत्तर दिले. नगर प्रशासन खात्यामध्ये सध्या 9,972 पदे रिक्त आहेत. ड श्रेणीतील रिक्त जागांवर सरकारकडून तर ब आणि क श्रेणीतील रिक्त पदांवर नगर प्रशासन संचालनालय पातळीवर नेमणुका केल्या जातील.उर्वरित जिल्हा पातळीवर बढती कोटय़ातील क श्रेणीच्या जागांवर नेमणुका करण्याची सूचना जिल्हाधिकाऱयांना देण्यात आली आहे. रिक्त पदांची भरती करण्यासाठी अर्थखात्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, सध्या नेमणुकीला स्थगिती असल्याने भरती करण्यात अडसर आहे. न्यायालयाकडून निर्बंध हटविण्यात आल्यानंतर रिक्त पदांच्या नेमणुकीची अधिसूचना जारी करण्यात येईल, अशी माहिती मंत्री नागराज यांनी दिली.

Advertisements

Related Stories

कर्नाटकमधील आरोग्य व्यवस्थेचे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडून कौतुक

triratna

कोरोना : मुख्य सचिवांना आदेशपत्रक काढण्याचा अधिकार

Amit Kulkarni

कर्नाटक: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून लसीकरण मोहीम शक्य

triratna

कर्नाटक: द्वितीय पीयूसी पुनर्मूल्यांकन निकाल जाहीर

triratna

ड्रग्स प्रकरण : सीसीबी महिना अखेर आधी आरोपप दाखल करणार

triratna

कर्नाटकात ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे ४ जणांचा मृत्यू

triratna
error: Content is protected !!