तरुण भारत

विनाअनुदानित शिक्षकांच्या समस्यांबाबत चर्चा

शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांनी समस्या सोडविण्याचे दिले ठोस आश्वासन

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

कर्नाटक राज्य माध्यमिक नोकर संघाच्यावतीने विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांनी शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांची भेट घेतली. यावेळी माजी सभापती बसवराज होरट्टी, आमदार निळकंठेगौडा या सर्वांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये शिक्षकांनी आपल्या समस्या सांगितल्या.

यावेळी शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांनी निश्चितच या समस्या सोडवू, असे आश्वासन दिले. बसवराज होरट्टी यांनी शिक्षकांच्या समस्या सोडविण्याबाबत आपले विचार व्यक्त केले. विनाअनुदानित शाळांचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, अशी मागणी त्यांनी यावेळी रेटून धरली. खासगी अनुदानित शाळांना जीवन संजीवनी योजना तसेच 2015 नंतरच्या रिक्त जागा भरणे, काल्पनिक वेतन देणे, यामध्ये ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्यावर निश्चितच विचार केला जाईल, असे सांगितले. शारीरिक शिक्षकांनाही साहाय्यक शिक्षकांचा दर्जा देण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. प्रारंभी कर्नाटक नोकर संघाचे प्रधान कार्यदर्शी जी. आर. भट्ट यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. राज्यभरातून आलेल्या शिक्षकांचे निवेदन सादर करण्यात आले आणि शिक्षकांच्या समस्यांची माहिती यावेळी देण्यात आली.

बेळगाव जिल्हय़ाचे एस. एस. मठद, एम. कोरीशेट्टी, सलीम कित्तूर, बी. पी. कानशिडे यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव, निपाणी, चिकोडी येथील अनेक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते. मारुती अजाणी, एन. व्ही. आपटेकर, आर. टी. केसरकर, एन. व्ही. खांडेकर यांनी विनाअनुदानित शाळा शिक्षकांचे नेतृत्व केले.

Related Stories

चार महिन्यांपासून धोकादायक विद्युत टॉवरकडे दुर्लक्ष

Amit Kulkarni

पाश्चात्यीकरण म्हणजे आधुनिकीकरण नव्हे

Rohan_P

अंकोल्यात 2 कोटी 68 लाखाची ब्राऊनशुगर जप्त

tarunbharat

कोरोनावरील लसीची रंगीत तालीम

Patil_p

कुली कामगारांना सोडले त्यांच्या गावी

Patil_p

उचगाव मराठी साहित्य संमेलन 24 जानेवारीला घेण्याचा निर्णय

Patil_p
error: Content is protected !!