तरुण भारत

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चंदा कोचर यांच्या पतीला जामीन

ऑनलाईन टीम / मुंबई : 


आयसीआयसीआय बँकेचे माजी सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, आयसीआयसीआय बँक-व्हिडिओकॉन मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. दीपक कोचर यांना गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) त्यांना अटक करण्यात आली होती. ईडीच्या चार्जशीटची दखल घेतल्यानंतर 30 जानेवारी रोजी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अ‍ॅक्ट (पीएमएलए) च्या विशेष कोर्टाने चंदा कोचरसह त्यांचा पती दीपक कोचर, व्हिडिओकॉन समूहाचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत आणि इतर आरोपींना समन्स बजावला होता.


आयसीआयसीआय बँकेतून हकालपट्टी करण्यात आलेल्या तत्कालीन मुख्य कार्यकरी अधिकारी चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून व्हिडीओकॉन समूहाला 1875 कोटीचे कर्ज मंजूर केले होते. त्यात त्यांनी पती दीपक कोचर यांना लाभ मिळवून दिल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.


दरम्यान, चंदा कोचर यांना मनी लाँडरिंग प्रतिबंधक विशेष न्यायालयाने (पीएमएलए) 12 फेब्रुवारी रोजी जामीन मंजूर करण्यात आला होता. परवानगी न घेता परदेशात प्रवास करण्यासह पाच लाख रुपयांच्या बॉन्डच्या अटीवर त्यांना हा जामीन मंजूर करण्यात आला होता. वेणुगोपाल धूत यांना कर्ज देण्याच्या बदल्यात लाच घेतल्याचा आरोप कोचर यांच्यावर आहे.

Related Stories

कोरोनाचा कहर : महाराष्ट्रात पहिल्यांदाच 31,855 नवे रुग्ण ; 95 मृत्यू

Rohan_P

महाराष्ट्रात 12,614 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

कोरोनाचे आणखीन दोन बळी, दिवसभरात 19 रूग्ण वाढले

Abhijeet Shinde

कोल्हापूर : हुपरी परिसरात कोरोनाबाधितांची संख्या १८० वर, पाच जणांचा मृत्यू

Abhijeet Shinde

ओबीसी आरक्षण : छगन भुजबळांच्या भेटीबाबत फडणवीसांनी केला खुलासा

Abhijeet Shinde

”देवेंद्र फडणवीसांच्या 45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या पुतण्याला लस मिळतेच कशी?”

Abhijeet Shinde
error: Content is protected !!