तरुण भारत

मराठा आरक्षणी इंद्रा साहणी निकालाचा विचार करावा

मराठा याचिकाकर्त्यांच्यावतीने डॉ. सिंघवी यांनी केला युक्तीवाद : याचिकाकर्ते संदीप पोळ, विवेक कुऱहाडे यांची माहिती

प्रतिनिधी / सातारा

Advertisements

 मराठा आरक्षण कायद्याला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयातले मराठा आरक्षण समर्थनार्थ हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे. त्या याचिकेवर सुनावणी पार पारली. त्यामध्ये न्यायाधिशांसमोर सिनीअर कौंन्सिल डॉ. अभिषेक मनू सिंघवी यांनी इंद्रा साहणी यांच्या निकालाचा विचार करावा, असा युक्तीवाद केल्याची माहिती याचिकाकर्ते संदीप पोळ, विवेक कुऱहाडे यांनी दिली.   याबाबत माहिती देताना संदीप पोळ, विवेक कुऱहाडे यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मराठा आरक्षणावरील अंतिम सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असून 50 टक्के मर्यादेबाहेर असल्यामुळे मराठा आरक्षण चुकीचे असल्याचे मराठा आरक्षण विरोधकांचे म्हणणे आहे. 50 टक्के ची मर्यादा घालणारा निकाल इंद्रा साहणी विरूध्द भारत सरकार या 1992 च्या खटल्याच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेला असल्यामुळे 50 टक्के ची मर्यादा आज 30 वर्षांनी कालबाहय़ ठरतो म्हणून ही सुनावणी 11 न्यायाधिशांच्या घटनापीठासमोर व्हावी असे ऍप्लीकेशन मराठा आरक्षण समर्थनार्थ हस्तक्षेप याचिकाकर्ते संदिप पोळ व विविक कुराडे पाटील यांनी मराठा समाजाच्यावतीने दि. 16 फेब्रुवारी 2021 रोची सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाकडे केले. त्यानंतर अशी मागणी करणारे दोनच अर्ज सर्वोच्च न्यायालयाकडे आले. हस्तक्षेप याचिकाकर्ते संदिप पोळ व विवेक कुराडे पाटील यांच्यावतीने ऍड. अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. त्यांनी देखिल इंद्रा साहणी निकालाचा फेरविचार करण्याद्दल अभ्यासपूर्ण युक्तिवाद केला. यावेळी सिंघवी यांनी 2017 मध्ये राज्यसभेच्या सिलेक्ट कमिटीने राज्यसभेत सादर केलेल्या अहवालातील काही भागाचे वाचन केले. सिंघवी यांनी वाचन केलेल्या भागात कमिटी ने नमूद केले आहे की या घटनादुरूस्तीने राज्य मागासवर्ग आयोगांच्या कामकाजावर, स्वातंत्र्य आणि कार्यपध्दतींवर कोणताही परिणाम होत नाही आणि राज्य यादीशी संबंधित इतर मागासवर्गीयांच्या समावेश वगळण्याचा राज्य मागासवर्ग आयोगांचा अधिकार आहे. राज्य सरकारच्या अखत्यारीतली आरक्षण राज्य सरकारच्या आधिकारात येतात, असा युक्तीवाद केला.

Related Stories

जिल्हा पुन्हा एकदा ‘लॉक’

Patil_p

फलटण तहसील कार्यालयही नाही सुरक्षित

Patil_p

वारणानगर (लांडेवाडी) येथील तीन महिला कोरोना पॉझिटिव्ह

triratna

शेतकऱ्यांनी नरेगा अंतर्गत फळबाग लागवड करावी

triratna

पालिकेतल्या कर्मचायांसाठी राखीव बेड ठेवा

Patil_p

मी लवकरचं बरा होईन; आमदार मकरंद पाटील यांची ट्विटद्वारे भावनिक साद

triratna
error: Content is protected !!