तरुण भारत

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन समाप्त

दोन्ही सभागृहे पुढील अधिवेशनापर्यंत स्थगित

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

जवळपास दोन महिने चाललेले संसदेचे अर्थसंकल्प अधिवेशन गुरुवारी समाप्त झाले आहे. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभा ही संसदेची दोन्ही सभागृहे पुढील अधिवेशनापर्यंत स्थगित करण्यात आली. अधिवेशनाचा प्रारंभ 29 जानेवारीपासून झाला होता. हे अधिवेशन 8 एप्रिलपर्यंत चालणार होते. तथापि, कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे ते नियोजित वेळेपेक्षा आधी संपविण्यात आले.

सध्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे कोरोनाग्रस्त आहेत. मात्र, त्यांची प्रकृती सुधारत आहे. ही माहिती पीठासीन अध्यक्ष भार्तृहरी मेहताब यांनी अधिवेशनाची सांगता करताना दिली. बिर्ला यांच्या अनुपस्थितीत मेहताब, राजेंद्र अग्रवाल, रमा देवी, मीनाक्षी लेखी आणि मिदुन रेड्डी यांच्या अध्यक्षवृंदाने काम हाताळले.

या अधिवेशनाचा पहिला भाग 29 जानेवारीपासून होता. अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर करण्यात आला. त्यानंतरचे सलग चार दिवस शेतकरी संघटनांच्या आंदोलनावर चर्चा करा अशी मागणी करत विरोधी पक्षांनी गदारोळ माजविल्याने वाया गेले. 8 मार्चला अधिवेशनाच्या दुसऱया भागाचा प्रारंभ झाल्ना.

महत्वाची विधेयके संमत

या अधिवेशनात वित्तविधेयकासह अनेक महत्वाची विधेयके संमत करण्यात आली. त्यात राष्ट्रीय राजधानी दिल्ली कायदा सुधारणा विधेयक, विदेशी गुंतवणुकीचे विमा क्षेत्रातील प्रमाण 74 टक्क्यांपर्यंत वाढविण्याची तरतूद असणारे विमा सुधारणा विधेयक इत्यादींचा समावेश आहे. या कालखंडात राज्यसभेने निर्धारित 116 तासांपैकी 104 तास काम केले, अशी माहिती राज्यसभेचे अध्यक्ष उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी अखेरच्या दिवशी दिली.

शारीरिक अंतरामुळे वेळेत बदल दोन व्यक्तींमध्ये सहा फुटाचे शारीरिक अंतर राखण्याच्या नियमामुळे यावेळी लोकसभा आणि राज्यसभा यांच्या कामकाज वेळांमध्ये बदल करण्यात आला होता. सकाळच्या सत्रात राज्यसभेचे कामकाज चालत असे. तर दुपारच्या सत्रात लोकसभेचे कामकाज चालविले जात असे. यामुळे दोन खासदारांमध्ये पुरेसे अंतर ठेवणे शक्य झाले. अशा प्रकारचा बदल इतिहासात प्रथमच करावा लागला. तशी परिस्थिती निर्माण झाली होती, असे नंतर सांगण्यात आले.

Related Stories

माजी न्यायाधीश कर्णन यांना अटक

Omkar B

१ जानेवारीच्या मुहुर्तावर भारतात ६७ हजार बालकांचा जन्म

prashant_c

मुलगी अल्पवयीन असली तरी निकाह वैध

Patil_p

दिल्लीत कोरोना रुग्णांनी ओलांडला 6.40 लाखांचा टप्पा

pradnya p

लॉकडाऊन हा अगदी शेवटचा पर्याय

Patil_p

दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या 6 लाख 32 हजार 821 वर

pradnya p
error: Content is protected !!