तरुण भारत

शेतकरी संघटनांचा आज देशव्यापी बंद

रस्ते-रेल्वे वाहतूक रोखण्याचा इशारा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

शेतकरी संघटनांनी कृषी कायद्याविरोधात 26 मार्च रोजी भारत बंदची हाक दिली आहे. हा बंद 12 तासांचा असून सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे. या ‘भारत बंद’दरम्यान दुकाने, बाजारपेठा व व्यापारी संस्था बंद राहतील. तसेच दूध, फळे आणि भाज्या यासारख्या आवश्यक वस्तूंचा पुरवठा खंडित होऊ शकतो. शेतकरी संघटनांकडून दिल्ली परिसरात व्यापक निदर्शने होण्याची शक्यता असल्याने दिल्ली-आगरा महामार्ग जाम होऊ शकेल. दिल्ली परिसरासह काँग्रेसशासित राज्यांमध्येही या बंदचे परिणाम दिसून येऊ शकतील. काँग्रेस, राष्ट्रवादीसह देशभरातील काही शेतकरी आणि व्यापारी संघटनांनी या बंदला पाठिंबा दर्शवलेला आहे.

केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱया शेतकरी संघटनांनी शुक्रवारी ‘भारत बंद’ पुकारला आहे. शेतकऱयांच्या ‘भारत बंद’च्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा पोलीसही सतर्क झाले आहेत. संवेदनशील जिह्यांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा मोडणाऱयांवर पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई केली जाणार असल्याचे दिसत आहे. आंदोलक शेतकऱयांकडून रस्ते, रेल्वे वाहतूकही विस्कळीत करण्याची योजना आहे.

Related Stories

पैलवान सुशीलकुमार रेल्‍वे सेवेतून निलंबित

triratna

लॉकडाऊनवरुन ठाकरे सरकारमध्ये मतभेद!; राष्ट्रवादीने केला जाहीर विरोध

Rohan_P

देशातील पहिल्या सी-प्लेन सेवेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

datta jadhav

चीनच्या कोंडीसाठी व्यापक रणनीती

Patil_p

राज्यात पुढच्या तीन तासांत विजेच्या कडकडाटसह पावसाची शक्यता

triratna

स्वस्त पेट्रोल, डिझेल, सिलिंडरचे आश्वासन

Patil_p
error: Content is protected !!