तरुण भारत

ऑलिम्पिक क्रीडाज्योतीच्या जगप्रवासाला प्रारंभ

फुकूशिमा : कोरोना विषाणूमुळे वर्षभराने लांबणीवर टाकाव्या लागलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या क्रीडाज्योतीच्या जगप्रवासाला गुरुवारी प्रारंभ झाला. फुकूशिमा येथील ऑलिम्पिक क्रीडाग्राम संकुलातून या प्रवासाला सुरुवात झाली. ही क्रीडाज्योत 121 देशांना भेटी देणार असून ऑलिम्पिक स्पर्धेच्या उंबरठय़ावर स्पर्धास्थळी दाखल होणार आहे.

मागील ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान क्रीडाज्योतीचा प्रवास व आताचा प्रवास यात मात्र बराच फरक असणार आहे. गुरुवारी क्रीडाज्योत प्रज्वलित केली गेली, त्यावेळी चाहत्यांना प्रवेश नव्हता. त्यामुळे, नेहमीची धामधूम, उत्सुकता यावेळी दिसून आली नाही.

Advertisements

यंदा क्रीडाज्योत विविध देशातील महत्त्वाच्या शहरातून मार्गोत्क्रमण करेल, त्यावेळी चाहत्यांना हजर राहता येईल. मात्र, यावेळी बरेच निर्बंध असणार आहेत.

Related Stories

जर्मनी-स्पेन फुटबॉल सामना सप्टेंबरात

Patil_p

लंडन डायमंड लीग स्पर्धा रद्द

Patil_p

उत्तम ‘टीम कम्पोझिशन’ हेच ब्रह्मास्त्र!

Patil_p

टेनिसपटू बार्टीने जिंकली गोल्फ स्पर्धा

Patil_p

ट्रेव्हर पेनी विंडीज संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक

Patil_p

मास्टरब्लास्टर सचिनच्या नव्या हेअर लूकची चर्चा

Omkar B
error: Content is protected !!