तरुण भारत

आय-लीग फुटबॉल स्पर्धेत चेन्नई सिटी, आयजॉल एफसीचे विजय

क्रीडा प्रतिनिधी / मडगाव

आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील प्ले-ऑफ ब गटातील सामन्यात चेन्नई सिटी आणि आयजॉल एफसी संघाने प्रतिस्पर्धी संघावर विजय नोंदविले. चेन्नई सिटीने नॅरोका एफसीचा 2-1 गोलांनी पराभव केला.

Advertisements

चेन्नई सिटीसाठी देमीर आवडीक व इक्बाल हुसेनने तर पराभूत नॅरोका एफसीचा एकमेव गोल रॉमटान सिंगने नोंदविला. या विजयाने चेन्नई सिटीला तीन गुण प्राप्त झाले. त्यांचे 14 सामन्यांतून 15 तर नॅरोका एफसीचे 14 सामन्यांतून केवळ 8 गुण झाले.

कल्याणी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आयजॉलने आरंभाच्या पिछाडीनंतर सुदेवा दिल्ली एफसीचा 2-1 गोलानी पराभव केला. सुदेवाच्या कियान लॅवीनसने सामन्याच्या 46व्या मिनिटाला गोल करून संघाला आघाडीवर नेले होते. त्यानंतर 90व्या मिनिटाला बावाल्ते रोहमिंगथांगाने आयझॉल एफसीचा बरोबरीचा गोल केला तर इंज्युरी वेळीतील सहाव्या मिनिटाला ब्रँडन वानलालरॅमडिकाने पेनल्टीवर विजयी गोलाची नोंद केली. आयजॉलचे 14 सामन्यांतून 24 तर सुदेवा दिल्लीचे 18 गुण झाले. प्ले-ऑफ गटातील कल्याणी स्टेडियमवर प्रकाशझोतात खेळविण्यात आलेल्या सामन्यात रियल काश्मीर संघाने कोलकाताच्या मोहमेडन स्पोर्टिंग क्लबचा 2-1 गोलांनी पराभव केला. रियल काश्मीरसाठी डॅनीश फारुख भट व मेझन रॉबर्टसनने तर मोहम्मेडन स्पोर्टिंगचा एकमेव गोल पेद्रु मँझीने केले. रियल काश्मीरचे 15 सामन्यांतून 21 तर मोहम्मेडन स्पोर्टिंगचे 20 गुण झाले. आज शुक्रवारी आय-लीगच्या जेतेपदासाठी चर्चिल ब्रदर्स विरूद्ध पंजाब एफसी तर ट्राव विरूद्ध गोकुळम केरळ अशा लढती सायंकाळी 5 पासून होतील.

Related Stories

हस्तांदोलनावेळी लस घेतल्याची विचारपूस करा

Amit Kulkarni

‘तौक्ते’मुळे राज्याची 146 कोटीची नुकसानी

Amit Kulkarni

माविन-मायकलमध्ये टॅक्सी मीटरवरुन धिरयो

Omkar B

“नम्र व सुस्वभावी व्यक्तीमत्व, अजातशत्रू आमदार” : राजेश पाटणेकर.

Amit Kulkarni

म्हापसा पालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना संधी : जॉन लोबो

Amit Kulkarni

डिजीटल मिटरसाठी टॅक्सी व्यवसायीकांना भरावी लागणार निम्मीच रक्कम, सर्व रक्कम वर्षभरात परत मिळणार

Amit Kulkarni
error: Content is protected !!