तरुण भारत

देशात 59,118 रुग्णांची वाढ

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशात मागील 24 तासात 59 हजार 118 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 257 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 18 लाख 46 हजार 652 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 60 हजार 949 एवढी आहे. 

Advertisements

गुरुवारी 32,987 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 12 लाख 64 हजार 637 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या 4 लाख 21 हजार 066 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 5 कोटी 55 लाख 04 हजार 440 जणांना लसीकरण करण्यात आले आहे.

देशात आतापर्यंत 23 कोटी 86 लाख 04 हजार 838 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 11 लाख 756 कोरोना चाचण्या गुरुवारी (दि.25) करण्यात आल्या.

Related Stories

1 कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण

Patil_p

बीएमडब्लू एक्स-1 चे फेसलिफ्ट मॉडेल भारतात सादर

tarunbharat

‘रेमडेसिवीर’ची उत्पादन क्षमता तिप्पट

datta jadhav

लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो हटवणार

datta jadhav

सर्वात कमी उंचीची वकील

Patil_p

नारदा खटला अन्यत्र स्थानांतरित करण्याची मागणी

Patil_p
error: Content is protected !!