तरुण भारत

”युपीए राज्याचा विषय नाही त्यामुळे जिल्हा स्तरावरील लोकांनी बोलू नये”

नवी दिल्ली / ऑनलाईन टीम

राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष बनवण्याचा पुनरूच्चार शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला होता. मात्र त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेत्यांकडून टीका करत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रियांना संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. युपीए राज्याचा विषय नाही, त्यामुळे राज्यातील, जिल्हा स्तरावरील लोकांनी केंद्रीय विषयावर बोलू नये, असा टोला संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांना लगावला आहे.

संजय राऊत यांच्यावर टीका करत नाना पटोले म्हणाले होते की, शिवसेना यूपीएचा घटक पक्षही नाही, संजय राऊत यांना यूपीएच्या नेतृत्वाबद्दल बोलण्याचा काही अधिकार नाही. तसेच संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का? असा टोला देखील त्यांनी लगावला होता. यासोबतच हुसेन दलवाई यांनी देखील संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. याचेच उत्तर संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत दिला आहे.

याविषयी दिल्लीत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, शरद पवार या देशाचे नेते आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे काय आहेत हे सर्वांना माहिती आहे. युपीएसंबंधी बोलण्यासाठी युपीएमध्ये असायला पाहिजे असं काही नाही. युपीए राज्याचा विषय नाही, त्यामुळे राज्यातील, जिल्हा स्तरावरील लोकांनी केंद्रीय विषयावर बोलू नये. हा राष्ट्रीय विषय असून राष्ट्राच्या हितासाठी या देशात एका मजबूत विरोधी पक्षाची आघाडी स्थापन व्हायची असेल तर मी सांगितलेल्या भूमिकांवर चर्चा होणं गरजेचं आहे. हे जर महाराष्ट्रातील नेत्यांना कळत नसेल तर त्यांनी राजकीय अभ्यास करणं गरजेचं आहे. तसेच हा दिल्लीतील चर्चेचा विषय असून महाराष्ट्र किंवा इतर राज्यांमध्ये ती होऊ नये. राष्ट्रीय विषय दिल्लीत चर्चिला जातो आणि तिथेच ही चर्चा झाली पाहिजे. या विषयावर सोनिया गांधी, राहुल गांधी बोलणार असतील तर आम्ही त्यांना उत्तर देऊ.

संजय राऊत पुढे म्हणाले की, माझ्यावर कोण टीका करत नाहीत तर आपल्या पक्षावरच टीका करत आहेत. या देशात जर एक उत्तम विरोधी पक्षांची आघाडी निर्माण झाली नाही तर तुम्ही भाजपचा पराभव कसा करणार याचं उत्तर मला प्रश्न विचारणाऱ्यांनी देणे गरजेचे आहे. त्यांनी उत्तर महाराष्ट्रातून न देता दिल्लीत येऊन द्यावे. कारण हा विषय राष्ट्रीय आघाडीचा आहे. जिल्हा किंवा तालुक्यातील नाही हे समजून घेण्याची गरज असल्याचे संजय राऊत य़ावेळी म्हणाले.

Related Stories

महाराष्ट्रात मागील 24 तासात 127 पोलिसांना कोरोनाची लागण

Rohan_P

विना मास्क फिरणाऱया 101 दुचाकीस्वारांवर करवाई

Patil_p

भारतीय ‘मिशन मंगळ’नंतर चीनचे  ‘रोवर मिशन टू मार्स’ लॉन्च

Rohan_P

सिप्लाचे ‘रेमडेसिवीर’ होणार 4 हजारात उपलब्ध

datta jadhav

”काँग्रेसचे टूल किट खलिस्तान्यांच्या टूल किटपेक्षा खतरनाक”

Abhijeet Shinde

कोल्हापूर : गोकुळचे दुध संकलन सुरू राहणार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!