तरुण भारत

अरळीकट्टी क्रॉसजवळ दोन लाख रुपये जप्त

पोलीस-निवडणूक विभागाची कारवाई

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

अरळीकट्टी क्रॉसजवळ निवडणूक विभागाच्या एसएसटी पथकातील अधिकाऱयांनी दोन लाख रुपये जप्त केले आहेत. बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी होणाऱया पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी ही कारवाई करण्यात आली आहे.

बैलहोंगल येथील उदयकुमार गोकाक हे 2 लाख रुपये घेऊन रायबागकडे जात होते. त्यावेळी अरळीकट्टी क्रॉसजवळ त्यांची तपासणी करण्यात आली. 2 लाख रुपये नेण्यासंबंधी कागदपत्रे हजर करण्यास अधिकाऱयांनी सांगितले. मात्र, उदयकुमार हे कसलीच कागदपत्रे हजर करू शकले नाहीत. कारमधून ही रक्कम नेण्यात येत होती, अशी माहिती एसएसटी पथकातील अधिकारी उमेश बाळेकुंद्री यांनी दिली.

निवडणूक विभागाच्या एसएसटी पथकातील अधिकाऱयांनी दोन लाख रुपये ताब्यात घेतले आहेत. हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार शिण्णूर पुढील तपास करीत आहेत. रकमेबाबतचा तपशील अधिकाऱयांनी मागितला आहे. सध्या निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे सर्वत्र तपासणी वाढविण्यात आली असून मोठी रक्कम नेताना त्या संबंधीची कागदपत्रे बाळगण्याची गरज आहे.

Related Stories

वीज चोरणाऱया शेतकऱयाला न्यायालयाचा दणका

Patil_p

बुडाच्या अध्यक्षपदी गुळाप्पा होसमनी

Rohan_P

विणकरांचे 1 लाखापर्यंतचे कर्ज माफ

Patil_p

यमकनमर्डी अपघातात कडोलीचा तरुण ठार

Patil_p

खासगीकरणाविरोधात बँक कर्मचाऱयांची निदर्शने

Amit Kulkarni

परराज्यांतून ग्रामीण भागात येणाऱयांची संख्या वाढली

Patil_p
error: Content is protected !!