तरुण भारत

‘कोल्हापूर द्राक्ष महोत्सव 2021’ चे उद्घाटन, जंबो सिडलेस द्राक्षे खास आकर्षण

शेतकरी उत्पादकांच्या मालाची थेट ग्राहकांनी विक्री, 30 मार्चपर्यंत शाहू स्मारकमध्ये द्राक्ष महोत्सव ग्राहकांसाठी खुला

कोल्हापूर/प्रतिनिधी

उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजनेंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगली आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोल्हापूर द्राक्ष महोत्सव 2021’ चे आयोजन करण्यात आले आहे. या कोल्हापूर द्राक्ष महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. आजपासून 30 मार्चपर्यंत दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे सकाळी 9 ते रात्री 8 या कालावधीत हा द्राक्ष महोत्सव ग्राहकांसाठी खुला राहणार आहे.

या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र कृषी पणन मंडळाचे उप सरव्यवस्थापक सुभाष घुले, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, माजी उपसभापती जीवन पाटील आदी उपस्थित होते. उद्घाटनानंतर जिल्हाधिकारी देसाई यांनी महोत्सवातील शेतकऱ्यांशी संवाद साधत माहिती घेतली.

मिरजेतील शेतकऱ्यांची जंबो सिडलेस ही द्राक्षे खास आकर्षण

महोत्सवामध्ये ग्राहकांना अनुष्का, रेडग्लोब, सुपर सोनाक्का, माणिकचमण, कृष्णा सिडलेस, आर.के.सुपर, शरद सिडलेस आदी जातींची द्राक्षे आहेत. मिरज तालुक्यातील सोनी येथील दिलीप पाटील, प्रतिक लेंगरे या शेतकऱ्यांची जंबो सिडलेस ही द्राक्षं या महोत्सवाची खास आकर्षण ठरली.

कोव्हिड-19 मुळे शेतकरी वर्गात शेतमाल उत्पादन विक्रीबाबत चिंतेचे वातावरण होते.  विशेषत: द्राक्ष बागायतदारांची निर्यात ठप्प होती. त्यामुळे  शेतकरी उत्पादकांच्या मालाची थेट ग्राहकांनी विक्री करण्याच्या उद्देशाने अशा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले असल्याचे पणन मंडळाचे उप सरव्यवस्थापक घुले यांनी सांगितले. याचबरोबर असा द्राक्ष महोत्सव गोवा येथेही भरवण्यात आला होता. ग्राहकांना  तसेच शेतकऱ्यांना याचा चांगला लाभ मिळाला. कोल्हापूर येथील महोत्सवातही ग्राहकांनी भेट देवून सहभाग घ्यावा. निर्यातक्षम, चांगल्या प्रतीची द्राक्ष ग्राहकांना थेट उत्पादकांकडून मिळतील. त्यामुळे शेतकऱ्यांनाही चांगला आर्थिक लाभ होईल, असे आवाहनही त्यांनी केले.

Advertisements

Related Stories

सांगरुळ आठवडी बाजार व एसटी सेवा सुरू करावी

Abhijeet Shinde

सांगली : पाणलोट क्षेत्रात मुसळधार कायम

Abhijeet Shinde

इचलकरंजीत जुगार अड्ड्यावर छापा; १२ जणांना अटक

Abhijeet Shinde

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उद्या चक्का जाम

Abhijeet Shinde

कोल्हापूर : गडहिंग्लज, राधानगरी तालुक्यासाठी साडेसात कोटी निधी

Abhijeet Shinde

डॉ. कादंबरी बलकवडे यांना प्रशासकपदी मुदतवाढ

Abhijeet Shinde
error: Content is protected !!