तरुण भारत

पंजाब : कोरोना बाधितांची संख्या 2.23 लाखांच्या उंबरठ्यावर

ऑनलाईन टीम / चंदीगड : 


पंजाबमध्ये मागील 24 तासात 2,700 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 43 जणांनी आपला जीव गमावला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 लाख 22 हजार 937 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.  

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, कालच्या दिवशी 1,735 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 2,22,937 रुग्णांपैकी 1 लाख 95 हजार 015 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 6 हजार 517 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 57 लाख 44 हजार 842 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 21 हजार 405 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 296 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 25 जण व्हेंटिलेटरवर आहेत. 

Related Stories

ममता बॅनर्जी लढणार पोटनिवडणूक

datta jadhav

देशात 22,854 नवे कोरोना रुग्ण; 126 मृत्यू

Rohan_P

प्रदूषणरहित इंधनाचा वापर करणार रेल्वे

Patil_p

उत्तराखंडातील कोरोना : मागील 24 तासात 1003 नवे रुग्ण; 30 मृत्यू

Rohan_P

चौथ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता

Amit Kulkarni

शेतकऱयांना नववर्ष भेट

edp
error: Content is protected !!