तरुण भारत

धोका वाढला : नागपूरात आज उच्चांकी रुग्णवाढ

  • दिवसभरात 4,095 नवे रुग्ण; 35 मृत्यू 


ऑनलाईन टीम / नागपूर : 


नागपूरमध्ये आज दिवसभरात 4,095 नव्या कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली. तर 35 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 11 हजार 162 वर पोहोचली आहे. सद्य स्थितीत 36,936 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Advertisements


ही आतापर्यंतची सर्वाधिक रुग्ण वाढ आहे. एका दिवसात कोरोनाचे एवढे रुग्ण आढळून आल्याने  शहरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरमधील निर्बंध 31 मार्चपर्यंत कायम ठेवण्यात आले आहेत. 


दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्ण संख्येमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. दरम्यान, आज दिवसभरात 1, 943 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 1 लाख 69 हजार 407 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 4,819 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला.

Related Stories

कचरा उचलताना नियम पायदळी

Patil_p

बोंबलून आशीर्वाद मिळत नाहीत, कामातून आशीर्वाद मिळतात; मुख्यमंत्र्यांचा राणेंना टोला

Abhijeet Shinde

मद्यपींची पाऊले परमीटरुम बिअरबारकडे

Patil_p

गोकुळ दूध संघाचा टँकर जप्त; मुंबईहून प्रवासी आणल्याने पोलिसांनी केली कारवाई

Abhijeet Shinde

कोल्हापूर : शंभर टक्के उत्तीर्ण; तोंडी परीक्षा कोणाची

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात 3442 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Rohan_P
error: Content is protected !!