तरुण भारत

विट्यात पोहताना बुडून युवकाचा मृत्यू

प्रतिनिधी / विटा

विहरीत पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. विवेक भीमराव चौगुले (२१, रा. हनुमान मंदिरजवळ, विटा) असे मयत तरूणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवार २६ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास येथील हराळे मळा येथे घडली. या प्रकरणी अनिल हराळे यांनी फिर्याद दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Advertisements

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, येथील विवेक भीमराव चौगुले शुक्रवार २६ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास येथील हराळे मळा येथील विहरीत पोहण्यासाठी मित्रांसोबत गेला होता. याच दरम्यान त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच अनिल हराळे यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत विवेकचा मृतदेह स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढला. या घटनेने चौगुले कुटुंबियांना मात्र चांगलाच धक्का बसला आहे.

दरम्यान, विवेक हा होतकरू आणि हुशार युवक होता. त्याचे वडील खासगी वाहनावर चालक म्हणून काम करतात. विवेक संगणक क्षेत्रात पारंगत होता. हातातोंडाशी आलेला मुलगा गेल्याने चौगुले कुटुंबाला धक्का बसला. त्याच्या पश्चात आई वडील, बहीण असा परिवार आहे. घटनेची पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

सांगली : ‘त्या’ धडकेतील जखमीचा मृत्यू, दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

मुंबईत कार्यरत असलेल्या चिंचणी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू

Abhijeet Shinde

विना अजेंडा लढणाऱ्या कारखानदारांना नाकारा : प्रकाश आंबेडकर

Abhijeet Shinde

कराड-रत्नागिरी महामार्ग २ तासासाठी रोखला

Abhijeet Shinde

सांगली (मिरज) : शिक्षण कर्जाच्या अमिषापोटी 65 हजारांची फसवणूक

Abhijeet Shinde

मिरजेत 168 मंडळांचा अंबाबामातेला निरोप

Abhijeet Shinde
error: Content is protected !!