तरुण भारत

‘वीवो’चे 5 जी स्मार्टफोन्स बाजारात

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मोबाईल निर्मितीमधील दिग्गज कंपनी वीवोने भारतीय बाजारामध्ये एक्स60 या आवृत्तीचे तीन स्मार्टफोन्स सादर केले आहेत. यामध्ये एक्स60 प्रो प्लस, एक्स60प्रो आणि एक्स60 या मॉडेलचा समावेश आहे.

Advertisements

 वीवोने सर्वात अगोदर डिसेंबर 2020 मध्ये चीनमध्ये या फोन्सचे सादरीकरण केले होते. सदर फोनमध्ये ट्रिपल आणि क्वाड रियर कॅमेरा मिळणार असून सोबत हाय रिप्रेश रेट डिस्प्ले आणि फास्ट चार्जिंगची सोयही असणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

  सदरचे स्मार्टफोन्स हे मिडनाइट ब्लॅक आणि शिमर ब्लू रंगामध्ये उपलब्ध होणार असून या आवृत्तीचे बुकिंग शुक्रवारपासून सुरु होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. तर यांची विक्री 2 एप्रिलपासून होणार असल्याची माहिती आहे.

सदरच्या सादर होणाऱया फोनमध्ये  5जी डुअल बँड, वायफाय जीपीएस, एनएफसी, ब्लूटय़ूथ आणि युएसबी टाईप सी पोर्ट अशा विशेष सुविधा मिळणार आहेत.

Related Stories

अत्याधुनिक अंतराळ पोशाख

tarunbharat

मोटोरोला एज 20 बाजारात लाँच

Amit Kulkarni

शाओमीचा स्वस्त स्मार्ट टीव्ही सादर

Patil_p

ओप्पोचा रेनो 6 सिरीजचा फोन लवकरच

Amit Kulkarni

रेडमीचा स्मार्ट बँड भारतीय बाजारात दाखल

Patil_p

7 जानेवारीला गॅलक्सी एम 02 बाजारात

Patil_p
error: Content is protected !!