तरुण भारत

ब्रिटनच्या डेपरची स्पर्धेतून माघार

वृत्तसंस्था/ मियामी

एटीपी टूरवरील येथे सुरू झालेल्या मियामी खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत गुरुवारी पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात ब्रिटनच्या जॅक डेपरने प्रकृती नादुरुस्तीमुळे स्पर्धेतून माघार घेतली. टेनिस कोर्टवर खेळताना डेपर अचानक खाली कोसळला. त्याला येथील दमट आणि उष्ण हवामानामुळे काही वेळ मूर्च्छा आली होती.

Advertisements

19 वषीय जॅक डेपरला या स्पर्धेत वाईल्डकार्डद्वारे प्रवेश देण्यात आला होता. कझाकस्तानचा कुकूशिखीन आणि ड्रेपर यांच्यात पहिल्या फेरीचा सामना आयोजित केला होता. या सामन्यात कुकूशिखीनने 6-5 अशी आघाडी घेतली असताना डेपर अचानकपणे कोर्टवर खाली कोसळला. कुकूशिखीनने हा पहिला सेट 7-5 असा जिंकल्यानंतर डेपरने या सामन्यातून माघार घेतली.

Related Stories

आयसीसी वर्ल्डकपसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पात्र

Patil_p

प्रसंगी रिक्त स्टेडियममध्ये आयपीएल खेळवा

Patil_p

अँडी मरेची सामन्यातून माघार

Patil_p

इंग्लंड महिलांचा भारतावर 4 गडय़ांनी विजय

Patil_p

रोहित शर्मा शेवटच्या दोन कसोटीत खेळणार

Patil_p

न्यू इन क्लासिक चेस क्लासिकमध्ये कार्लसन विजेता

Patil_p
error: Content is protected !!