तरुण भारत

चिंताजनक : महाराष्ट्रात 36,902 नवे कोरोनाबाधित,112 मृत्यू

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत चालला आहे. शुक्रवारी पहिल्यांदाच राज्यात उच्चांकी म्हणजेच 36 हजार 902 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 112 जणांचा मृत्यू झाला आहे. यामधील 5 हजार पेक्षा अधिक रुग्ण हे एकट्या मुंबईत सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 26 लाख 37 हजार 735 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 53 हजार 907 एवढा आहे. 

Advertisements


कालच्याा एका दिवसात 17,019 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर राज्यात आतापर्यंत 23 लाख 00 हजार 056 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य स्थितीत राज्यात 2 लाख 82 हजार 451 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.02 % तर मृत्युदर 2.04 इतका आहे. 

  • मुंबईत बुधवारी 5,513 नवे बाधित 


मुंबईतत कालच्या दिवसात 5,513 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. ही आतापर्यंतची सर्वाधिक रुग्ण वाढ आहे. काल दिवसभरात 9 जणांचा मृत्यू झाला. त्यासोबतच 1,658 जणांना डिस्चार्ज देखील देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3,85,628 वर पोहचली आहे. तर 3,35,261 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांची एकूण संख्या 11,629 इतकी आहे. 


सद्य स्थितीत 37 हजार 804 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सद्य स्थितीत रुग्ण दुपटीचा कालावधी 68 दिवसांचा आहे. दरम्यान, वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. 

Related Stories

एनी डेस्क ऍपद्वारे सातारा, फलटणमध्ये फसवणूक

Patil_p

नाशिक झेडपीच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर 8 लाखांची लाच घेताना जाळ्यात

Rohan_P

महाराष्ट्र : मागील 24 तासात 6 हजार पेक्षा अधिक रुग्ण कोविडमुक्त!

Rohan_P

खवले मांजराची तस्करी; चौघांच्या मुसक्या आवळल्या

Patil_p

बेस्टच्या 26 इलेक्ट्रिक बसेसचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Rohan_P

संघाच्या शिवाजीराव पाटील गटास न्यासाची मान्यता

Patil_p
error: Content is protected !!