तरुण भारत

भाजी मार्केट बंद ठेवल्याने शेतकऱयांची गैरसोय

लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजी मार्पेटचा वापर : खरेदी विक्रीवर परिणाम : व्यावसायिकांचेही हाल

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

एपीएमसीमधील भाजीमार्केटमध्ये बॅलेट मशीन वितरणाचे काम सुरू आहे. त्याकरिता भाजी मार्केटचे कामकाज दोन दिवस बंद ठेवण्यात आले आहे. तरीदेखील माहिती नसलेल्या शेतकऱयांनी भाजी आणल्याने गोंधळ उडाला. अखेर व्यापाऱयांनी रस्त्यावर थांबूनच भाजीचा लिलाव करून विक्री केली.

एपीएमसी येथील गोडाऊनमध्ये बॅलेट मशीन व विविध साहित्य ठेवण्यात आले आहे. सदर साहित्य विभागवार वितरणासाठी भाजीमार्केटचा उपयोग करण्यात आला आहे. भाजी मार्केटच्या तळघरात ही व्यवस्था करण्यात आली होती. त्याकरिता संपूर्ण भाजीमार्केटमधील व्यवहार बंद करण्याची सूचना व्यापाऱयांना करण्यात आली होती. त्यानुसार दोन दिवस भाजीमार्केटचा व्यवहार बंद ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी बॅरिकेड्स लावून भाजीमार्केटकडील रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. मात्र भाजीमार्केटचा व्यवहार बंद असल्याची माहिती विविध भागातील शेतकऱयांना मिळाली नाही. त्यामुळे काही शेतकऱयांनी भाजी मार्केटमध्ये शुक्रवारी भाजी आणली होती. त्यामुळे भाजीविपेत्या व्यावसायिकांची गोची झाली. भाजी कुठे उतरवून घ्यायची, असा मुद्दा उपस्थित झाल्याने गोंधळ उडाला. शेवटी एपीएमसी कार्यालयाच्या मागील बाजुस असलेल्या कठडय़ावर व खुल्या जागेत भाजी उतरवून लिलाव करण्यात आला. तसेच विविध भागात भाजीपाला पाठविणाऱया व्यावसायिकांनी त्या ठिकाणीच वाहनांमध्ये भाजीपाला भरून पाठविला.  संपूर्ण भाजीमार्केट बंद ठेवण्यात आल्याने शेतकरी व व्यापाऱयांची गैरसोय झाली. शनिवारी सकाळपासून भाजीमार्केटचे कामकाज पूर्ववत सुरू चालू राहणार असल्याची माहिती बाजार समिती अध्यक्ष युवराज कदम यांनी दिली आहे.

Related Stories

भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयात आता दोन वाघ दाखल

Omkar B

चालकावर हल्ला करून पळविलेली कार ताब्यात

Amit Kulkarni

वीजनिर्मिती प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत चार कंत्राटदारांचा सहभाग

Amit Kulkarni

निवडणुकीमुळे किरकोळ भाजी मार्केटमधील वर्दळ थंडावली

Patil_p

आजपासून सिव्हिल हॉस्पिटलमधील ओपीडीला सुरुवात

Patil_p

जाब विचारताच मराठीतून स्वीकारले उमेदवारी अर्ज

Patil_p
error: Content is protected !!