तरुण भारत

जोफ्रा आर्चरवर उद्या शस्त्रक्रिया

पुणे / वृत्तसंस्था

इंग्लंडचा दुखापतग्रस्त स्पीडस्टार जोफ्रा आर्चरच्या उजव्या हातावर उद्या (सोमवार दि. 29) शस्त्रक्रिया केली जाणार आहे. आर्चरने भारताविरुद्ध मालिकेत 2 कसोटी व 5 टी-20 सामने खेळले असून त्याने कसोटीत 4 व टी-20 मध्ये 5 बळी घेतले. काही दिवसांपूर्वी तो मायदेशी रवाना झाला. त्याच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती ईसीबीने दिली. जानेवारीत घरी स्वच्छता करत असताना त्याच्या हाताला दुखापत झाली होती. ती दुखापत आता चिघळली आहे. 25 वर्षीय आर्चरने इंग्लंडतर्फे 42 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यात 86 बळी घेतले आहेत.

Advertisements

Related Stories

जोकोविच, फेडरर, ओसाका, सेरेना, बार्टी दुसऱया फेरीत

Patil_p

दक्षिण आफ्रिका संघात दोन नवे चेहरे

Patil_p

अर्सेनलकडे एफए फुटबॉल चषक

Patil_p

जो रूटच्या धमाक्याने इंग्लडचा पहिल्या डावात धावांचा डोंगर

triratna

आशियाई वेटलिफ्टींग स्पर्धेत झिलीला सुवर्णपदक

Patil_p

टाटा ओपनसाठी रामकुमारला वाईल्डकार्ड

Patil_p
error: Content is protected !!