तरुण भारत

शहरात मतदान जनजागृती रॅली

प्रतिनिधी/ बेळगाव

लोकसभा पोटनिवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदानासंदर्भात जनजागृती करण्यासाठी जिल्हा स्वीप समितीच्यावतीने शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालय येथे या रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर शहरातून ही रॅली काढण्यात आली आहे.

Advertisements

मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावावा, मतदानाचा हक्क बजावणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तेव्हा मतदानासाठी पुढे या, असे फलक हाती घेऊन ही रॅली काढण्यात आली. सकाळी 10 वाजता रॅलीचे उद्घाटन झाले. शिक्षण खात्याच्या कार्यालयातून या रॅलीला सुरुवात झाली. कित्तूर चन्नम्मा चौक, आरटीओ सर्कल, किल्ला तलाव, कणबर्गी रोड, रामतीर्थनगर यासह इतर परिसरातून ही रॅली काढण्यात आली.

यावेळी बीईओ रवी बजंत्री, जिल्हा स्वीप समितीचे राघवेंद्र अण्णीकेरी, पी. पी. देशपांडे, ए. पी. बसवनाळ यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

Related Stories

रेल्वे दुपदरीकरण गोव्याच्या विकासासाठीच

Omkar B

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद

Amit Kulkarni

‘मल्टिलेव्हल’चा गुंतवणूकदारांना कोटय़वधीचा गंडा

Amit Kulkarni

रेल्वे यार्डमध्ये अनोळखी युवकाचा संशयास्पद मृत्यू

Amit Kulkarni

बालिका आदर्श विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती

Amit Kulkarni

रिया खोत हिचा अमेरिकेत पुरस्कार देऊन गौरव

Patil_p
error: Content is protected !!