तरुण भारत

कोईम्बतूर क्षेत्रातील 22 जागा हायप्रोफाइल

3 मंत्री, एक पक्षाध्यक्ष, 2 प्रदेशाध्यक्षांसह कमल हासन यांची उमेदवारी

औद्योगिक केंद्राच्या स्वरुपात प्रसिद्ध कोईम्बतूर आणि त्याला लागून असलेल्या धारापुरम नमक्कलमधील 22 मतदारसंघ हायप्रोफाइल ठरले आहे. या मतदारसंघांमध्ये राज्याचे 3 मंत्री, भाजपच्या महिला राष्ट्रीय अध्यक्षा, भाजप तसेच एमएनएम प्रदेशाध्यक्षासह दोन माजी मंत्र्यांचे राजकीय भवितव्य येथे पणाला लागले आहे. कमल हासन आणि त्यांच्या पक्षाची राजकीय वाटचाल या निवडणुकीतून ठरणार आहे. विद्यमान मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. तर भाजपसोबत आघाडी, जलसंकट अण्णाद्रमुकसाठी अवघड जागेचे दुखणे ठरले आहे. ए राजा यांच्यावरील 2जी घोटाळय़ाचे आरोप संपणे, प्रभावी घोषणापत्र, कमल हासन आणि दिनाकरन यांच्यामुळे मतविभागणी झाल्याने अण्णाद्रमुकच्या या बालेकिल्ल्यात द्रमुकला शिरकावाची मोठी संधी मिळाली आहे. 

Advertisements

मागील एक वर्षात मुख्यमंत्री ई. पलानिसामी यांनी 10 वर्षांची सत्ताविरोधी भावना कमी करण्यास बऱयाच अंशी यश मिळविल्याचे मानले जात आहे. पण 1996 मध्ये अण्णाद्रमुकला 4 जागा मिळालेल्या असतानाही 28 टक्के मते प्राप्त झाली होती. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत केवळ 18 टक्के मते मिळणे कमी होत चालेल्या जनपाठिंब्याचा संकेत आहे.

पोलाची सेक्स स्कँडलच्या सीबीआय चौकशीमुळे चर्चेत आलेले द्रमुक खासदार षणमुगम यांच्यानुसार पाणी खासगीकरणाच्या 3 हजार कोटींच्या कंत्राटात झालेला भ्रष्टाचार अण्णाद्रमुकच्या तोंडचे पाणी पळविणार आहे. हाच आरोप एममएनएमचे उमेदवार आर. महेंद्रन यांनीही केला आहे. पण भाजप उमेदवार आणि महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा वानती श्रीनिवासन यांनी याला दुष्प्रचार ठरविले आहे.

1996 मधील बॉम्बस्फोटानंतर येथे ध्रूवीकरणाची पार्श्वभूमी तयार झाली आहे. उत्तर भारतीयांची लक्षणीय संख्या असलेल्या कोईम्बतूर दक्षिण मतदारसंघात ‘वानती अक्का, जीतेगी पक्का’ असा नारा देण्यात येत आहे. कमल हासन हे कोईम्बतूरचे पाहुणे आहेत असे म्हणत वानती त्यांचे आव्हान फेटाळून लावत आहेत.

कोंगूनाडचा मुद्दा सर्वांच्या ठायी

तमिळ राजकारणाच्या दोन पक्षीय व्यवस्थेत कमल हासन असो किंवा दक्षिणेचे ‘लालू यादव’ अभिनेता विजयंकात, दिनाकरन किंवा प्रभाकरनच्या पोस्टरसह प्रचार करणारे कट्टर तमिळ प्रतिमेचे सीमान हे सर्व केवळ क्राउड पूलर आहेत. यांची भूमिका केवळ मतविभागणीपुरती मर्यादित असल्याचे एका वरिष्ठ पत्रकाराचे म्हणणे आहे. कोईम्बतूर क्षेत्रात राहुल गांधी रविवारी प्रचार करताना दिसून आले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मार्च रोजी धारापुरम येथे असणार आहेत. तसेच योगी आदित्यनाथही येथे प्रचार करणार आहेत.

कोईम्बतूर दक्षिण मतदारसंघ

या हायप्रोफाइल मतदारसंघात मक्कल नीधि मय्यम अध्यक्ष कमल हासन, भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्षा वानती श्रीनिवास, द्रमुक-काँग्रेस आघाडीतर्फे काँग्रेसच्या मयुरा जयकुमार उभ्या राहिल्या आहेत. एमएमकेकडून उद्योगपती चॅलेंजर दुरईस्वामी मैदानात आहेत.

Related Stories

चौथ्या शनिवारी सुटी न घेणाऱया सरकारी कर्मचाऱयांना 15 दिवस प्रासंगिक रजा

Patil_p

हिंमत असल्यास अटक करून दाखवा!

Omkar B

महाकुंभमेळ्यात कोरोना : एका दिवसात 102 जण पॉझिटिव्ह

pradnya p

देशात 1.50 लाख ॲक्टिव्ह रुग्ण

datta jadhav

आता जम्मू-काश्मीर अन् लडाखमध्येही खरेदी करता येणार जमीन

datta jadhav

राम मंदिराबाबत आक्षेपार्ह पोस्ट, मुक्त पत्रकार अटकेत

datta jadhav
error: Content is protected !!