तरुण भारत

जमुरिया मतदारसंघातील लढत लक्षवेधी

डाव्यांचा एकेकाळचा बालेकिल्ला- आयशी घोष यांना उमेदवारी

जेएनयूच्या विद्यार्थीसंघाच्या अध्यक्षा आयशी घोष मागील वेळी कॅमेऱयासमोर दिसून आल्या होत्या, तिच्या डोक्यावर पट्टी बांधलेली होती. अभिनेत्री दीपिका पदूकोनने तिच्या खांद्यांवर हात ठेवलेला होता. हे 5 जानेवारी 2020 रोजी जेएनयूत झालेल्या हल्ल्यानंतरचे छायाचित्र होते. एक वषांनंतर आयशी लोकांच्या गर्दीत दिसून येत असली तरीही यावेळी जेएनयू परिसर नव्हे तर पश्चिम बंगालमधील राजकीय मैदान आहे.

Advertisements

माकपने बंगालच्या पश्चिम वर्धमान जिल्हय़ातील जमुरिया मतदारसंघात आयशीला उमेदवारी दिली आहे. मागील काही निवडणुकांपासून डावे पक्ष बंगालच्या राजकारणात प्रभावहीन होत चालले आहे. पण यंदा भाजप आणि तृणमूलच्या मुख्य लढाईत डावे मतदार गेमचेंजर ठरू शकतात.

डाव्यांचा गड

जमुरिया हा पारंपरिक दृष्टय़ा डाव्या पक्षांचा बालेकिल्ला आहे. माकप उमेदवार जहांनारा खान यांनी 2016 च्या निवडणुकीत विजय मिळविला होता. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या विधानस मतदारसंघातील माकपचा प्रभाव ओसरताना दिसून आला. येथे भाजप उमेदवाराला प्रचंड आघाडी मिळाली होती.

2018 च्या हिंसेची पार्श्वभूमी

या मतदारसंघातील मतांच्या ध्रूवीकरणाचे एक कारण 2018 मध्ये आसनसोल राणीगंज-जमुरिया भागात झालेल्या दंगलींना मानण्यात आले. 2019 च्या झटक्यानंतर डावे पुन्हा एकदा स्वतःचा प्रभाव दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. माकपने यंदा प्रचारात तरुण चेहऱयांना प्राधान्य दिले आहेत. ‘हाल फेराओ, लाल फेराओ’ हा नारा देण्यात येत आहे.

बेरोजगारी, परप्रांतीयांबद्दल नाराजी

या मतदारसंघात बेरोजगारी आणि परप्रांतीय विशेषकरून झारखंडमधून येणाऱया लोकांबद्दल नाराजी आहे. हे परप्रांतीय पोलाद प्रकल्पात काम करतात. पूर्ण बंगालमध्ये डाव्या पक्षांच्या उमेदवारांच्या विजयाबद्दल साशंकता व्यक्त होते. याचमुळे त्या पक्षाशी निष्ठ असणारे मतदारही अन्य पर्यायांकडे वळत असल्याचे मानण्यात येते.

Related Stories

कृषी कायद्यांविरोधात २७ सप्टेंबरला भारत बंद, राकेश टिकैतांची घोषणा

Abhijeet Shinde

TMC ला गळती; आणखी एका आमदाराने सोडली साथ

datta jadhav

जीएसटी संकलन, उत्पादन क्षेत्रात मोठी वाढ

Patil_p

नववधूला उचलून घेत ओलांडली नदी

Patil_p

‘स्पुतनिक-व्ही’ लसीचे ऑगस्टपासून भारतात उत्पादन?

datta jadhav

ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट गाठू शकते उच्चांक

datta jadhav
error: Content is protected !!