तरुण भारत

दिल्ली संघाचे प्रशिक्षक पाँटिंग लवकरच मुंबईत दाखल

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

9 एप्रिलपासून सुरू होणाऱया 2021 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रमुख प्रशिक्षक ऑस्ट्रेलियाचे रिकी पाँटिंग लवकरच मुंबईत दाखल होणार आहेत.

Advertisements

या स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाचा सलामीचा सामना चेन्नई सुपरकिंग्ज संघाबरोबर मुंबईत 10 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर खेळविला जाणार आहे. दिल्ली संघाच्या साहाय्यक प्रशिक्षकपदी भारताचा माजी यष्टीरक्षक अजय रात्राची नियुक्ती केल्याची माहिती या संघाच्या फ्रँचायजीनी दिली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाच्या प्रशिक्षकवर्गामध्ये पाँटिंग, मोहम्मद कैफ, प्रवीण आमरे, जेम्स हॉप्स आणि अजय रात्रा यांचा समावेश आहे. 2020 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. पण मुंबई इंडियन्सकडून त्यांना हार पत्करावी लागली होती. दिल्लीचा संघ सध्या मुंबईत या स्पर्धेसाठी आपला सराव करीत आहे.

Related Stories

ऍथलिट्सनी स्वतःच्या जबाबदारीवर प्रशिक्षण सुरू करावा : क्रीडा प्राधिकरण

Patil_p

आनंद-क्रॅमनिक लढत बरोबरीत

Patil_p

एफसी इस्तिकलोलने पटकावला सुपर कप, खुजान्दवर मात

Patil_p

श्रेयस अय्यर वनडे मालिकेतून बाहेर

Patil_p

चहलला क्रीझचा आणखी उत्तम लाभ घेता येईल

Patil_p

पाकच्या सना मिरचे अभिनंदन

Patil_p
error: Content is protected !!