तरुण भारत

वेदांता महिला फुटबॉल स्पर्धेत एफसी वायएफएचा तीन गोलांनी विजय

क्रीडा प्रतिनिधी/मडगाव

गोवा युनायटेड स्पोर्ट्स अकादमीचा 3-0 गोलांनी पराभव करून फुटबॉल क्लब वायएफए संघाने गोवा फुटबॉल संघटनेने आयोजित केलेल्या वेदांता महिला लीग फुटबॉल स्पर्धेत दमदार विजय मिळविला.

Advertisements

काल हा सामना जीएफएच्या धुळेर मैदानावर खेळविण्यात आला. पहिल्या सत्रात एकही गोल झाला नाही. फुटबॉल क्लब वायएफए संघाने सामन्याच्या 49व्या मिनिटाला ऍन्सिवा वाझच्या पासवर चॅल्सीच्या गोलद्वारे आघाडी घेतली. त्यानंतर 60व्या मिनिटाला सोमय्या मुकूंदनने 45 यार्डवरून फटका हाणला व दुसऱया गोलाची नोंद झाली.

सामन्याच्या शेवटच्या क्षणी फुटबॉल क्लब वायएफए संघाने तिसऱया गोलाची नोंद रिया पिरीसने केली. काल उत्कृष्ट खेळ करणाऱया फुटबॉल क्लब वायएफए संघाच्या सोमय्या मुकूंदनला प्रशिक्षक आगुस्तीन डायस व व्यवस्थापक जेझुस्ली बाप्तिस्ता यांच्या हस्ते प्लेअर ऑफ दी मॅच पुरस्कार देण्यात आला.

Related Stories

किरण कांदोळकर यांची उत्पल पर्रीकरांशी तासभर चर्चा

Patil_p

धेंपो क्लब-चर्चिल ब्रदर्स प्रो. फुटबॉल स्पर्धेतील लढत बरोबरीत

Amit Kulkarni

सांकवाळ भागाला वादळी वाऱयाचा फटका

Omkar B

लोकांचे प्रश्न सरकारसमोर मांडायचे कसे?

Patil_p

पाच पालिकांसाठी 366 उमेदवार

Amit Kulkarni

खाण व्यवसाय सुरू करण्यासंबंधी पोकळ आश्वासने

Amit Kulkarni
error: Content is protected !!