तरुण भारत

कोरोनाचा नायनाट कर, समृद्ध जीवनाची दिशा दे !

वार्ताहर/ निपाणी

कोरोना संसर्गाचे संकट गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगावर घोंगावत आहे. सध्या दुसऱया टप्प्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या कोरोनाच्या संसर्गामुळे जनमानसांवर विपरीत परिणाम होत आहे. दैनंदिन व्यवहारावर परिणाम होताना जगणे मुश्कील झाले आहे. अशा या ‘कोरोनाचा नायनाट कर व सर्वांना समृद्ध व आरोग्य संपन्न जीवन जगण्याची दिशा दे’. अशी प्रार्थना करताना होळी प्रदीपन करताना निपाणीसह परिसरातील ग्रामीण भागात रविवारी शिमगोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

Advertisements

कोरोना संसर्गाकडे दुर्लक्ष करत गेल्या आठवडय़ापासून निपाणीसह परिसरात शिमगोत्सवाची तयारी सुरू होती. बाजारपेठेत टिमक्यांचा आवाज दुमदुमत होता. बालचमू व युवक मंडळांचे कार्यकर्ते घरोघरी, दुकानात जाऊन होळीसाठी गोवऱया व निधी संकलन करत होते. रविवारी सकाळपासून गल्लीबोळात व मुख्य ठिकाणी होळी प्रदिपनाची तयारी सुरू होती. गोवऱया रचताना सभोवती आकर्षक रांगोळय़ा रेखाटण्यात आल्या होत्या. सूर्यास्त झाल्यानंतर विधीवत पूजा करून होळी प्रदीपन करण्यात आल्या. कोरोनाचा नायनाट कर अशी प्रार्थना करून होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून भाविकांनी श्रीफळ वाढविले. यावेळी सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

साखरवाडी येथे हनुमान मंदिरासमोर नवरात्री उत्सव मंडळाच्यावतीने होळी प्रदीपन करण्यात आले. मान्यवरांसह नागरिक, महिला, युवक, बालचमूंनी यावेळी आनंदोत्सव साजरा केला. मंडळाने अनेक वर्षाची परंपरा कायम ठेवत अन्नदानाचे महत्त्व विशद करताना नैवेद्य संकलित करून गरजूंना वितरण केले.

Related Stories

लसीबाबत साशंकता नको

Amit Kulkarni

आजही सरकारी बससेवा ठप्पच राहणार

Patil_p

अरगन तलाव परिसरातील रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य

Amit Kulkarni

‘सिरिंडीपिटी’ फशन शो

Omkar B

सार्वजनिक स्थळी धूम्रपान करणाऱयांवर कारवाईची सूचना

Patil_p

बीपीएल रेशनकार्डधारकांना आता माणसी 10 किलो तांदुळ मोफत

Patil_p
error: Content is protected !!