तरुण भारत

गणित विषय शिक्षकांची कार्यशाळा

प्रतिनिधी/ बेळगाव

क्षेत्र शिक्षणाधिकारी कार्यालयाच्यावतीने ठळकवाडी हायस्कूल येथे गणित विषयाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला एसकेई सोसायटीच्या स्कूल कमिटीचे चेअरमन एस. वाय. प्रभू, शहर शिक्षणाधिकारी रवी बजंत्री, न्यू गर्ल्स हायस्कूलचे मुख्याध्यापक जे. यू. घाडी, ठळकवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक आर. आर. कुडतरकर, बालिका आदर्श शाळेचे मुख्याध्यापक एन. ओ. डोनकरी, मराठा मंडळ जिजामाता हायस्कूलचे सहशिक्षक एस. एम. वड्डेबैलकर, विज्ञान विकास मंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुरेश कळ्ळेकर यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.

Advertisements

कार्यक्रमाची सुरुवात इशस्तवन व स्वागतगीताने झाली. एन. जे. चौगुले यांनी प्रास्ताविक केले. नंदा शिंदे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. बडमंजी यांनी विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली. एस. वाय. प्रभू यांनी मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपले विचार मांडले. त्यानंतर त्यांनी गणित मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन व वितरण केले. कामत यांनी आभार मानले. सूत्रसंचालन एस. जी. बाळेकुंद्री यांनी केले.

दुसऱया सत्रात जे. यू. घाडी यांनी एसएसएलसी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरुप समजावून दिले. तिसऱया सत्रात क्षेत्र शिक्षणाधिकारी रवी बजंत्री यांनी पासिंग पॅकेज व स्कोअरिंग पॅकेज पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी गणित विषयाचे शिक्षक उपस्थित होते.

Related Stories

कणबर्गी हिंडाल्को रोडवर खड्डय़ांचे साम्राज्य

Amit Kulkarni

वीजबिल भरण्यासाठी ऑनलाईन पर्याय सर्वोत्तम

Amit Kulkarni

छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळय़ासमोर ठेवा

Amit Kulkarni

जमखंडीतील मतमोजणी केंद्राची तहसीलदारांकडून पाहणी

Patil_p

नरेगा कामगारांची होणार मोफत आरोग्य तपासणी

Patil_p

दारू दुकाने उद्या बंद ठेवण्याचा आदेश

Amit Kulkarni
error: Content is protected !!