तरुण भारत

कोगनोळी नाक्यावर तीन शिफ्टमध्ये तपासणी

वार्ताहर/  कोगनोळी

नजीकच्या महाराष्ट्र राज्यामध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर 22 फेब्रुवारीपासून आजतागायत कर्नाटक सरकारच्या विविध खात्यांचे अधिकारी कोगनोळी टोलनाका व महामार्गावर कार्यरत आहेत. सध्या या ठिकाणी तीन शिफ्टमध्ये काम सुरू असून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे.

Advertisements

सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत 10 कर्मचारी, दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत 7 कर्मचारी, रात्री 9 ते सकाळी 9 वाजेपर्यंत 2 कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंगद्वारे तपासणी बंद करण्यात आली आहे. या महामार्गावर कोगनोळी हा आंतरराज्य महामार्ग असल्याने महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱया प्रवाशांमुळे कोरोना संसर्गाचा धोका निर्माण होण्याची शक्मयता असल्याने महाराष्ट्रातून येणाऱया प्रवाशांना आरटीपीसीआर हे निगेटिव्ह प्रमाणपत्र असल्याशिवाय प्रवेश देऊ नये, अशा सूचना जिल्हाधिकाऱयांनी सीमा तपासणी नाक्मयावरील अधिकारी व कर्मचाऱयांना दिल्या आहेत.

अहवाल नसल्यास प्रवेशास नकार

72 तासांच्या आतील निगेटिव्ह अहवाल वाहनधारकांकडे नसल्यास वाहनधारकांना परत पाठविण्यात येत आहे. आरटीपीसीआर रिपोर्ट असणे आवश्यक आहे. आरटीपीसीआर रिपोर्ट नसणाऱया वाहनधारकांना परत महाराष्ट्रात पाठविण्यात येत आहे. कागल व कोल्हापूर येथे आरटीपीसीआर टेस्ट करून पुन्हा कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. स्थानिक लोकांना 24 तासांच्या आत असेल तर प्रवेश दिला जात आहे. त्याचबरोबर टोलनाका पावती असणे आवश्यक आहे. शिवाय रुग्ण, दवाखाना अथवा योग्य कारण असणे आवश्यक आहे. याची पडताळणी करूनच स्थानिक लोकांना प्रवेश दिला जात आहे.

अधिकारी 24 तास कार्यरत

 दिवसभरामध्ये चिकोडी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी बन्ने यांच्यासह परिचारिका अश्विनी इंगवले, आशा कार्यकर्त्या अर्चना कांबळे, मंगल कुंभार, नीता कांबळे, ललिता कांबळे कार्यरत आहेत. निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे फौजदार बी. एस. तळवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनधारकांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या नाक्मयावर पोलीस अधिकाऱयांसह कर्मचारी कार्यरत आहेत.

Related Stories

सोमवार गर्दीचा… वाहतूक कोंडीचा!

Amit Kulkarni

लॉकडाऊनकाळात इंदिरा कॅन्टीन ठरताहेत आधार

Amit Kulkarni

मतदान केंद्र स्थापन करा अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार

Patil_p

सौंदत्ती डोंगरावर आजपासून धार्मिक कार्यक्रम

Amit Kulkarni

कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदतर्फे ‘बार’च्या पदाधिकाऱयांचा सत्कार

Patil_p

वाढीव वीजबिलाचा बसतोय शॉक

Amit Kulkarni
error: Content is protected !!